उदगीर बाजार समिती व आडत असोसीयशनच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार
लातूर जिल्हा बँकेला विभागीय स्तरावरील वैकुंठभाई मेहता पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाभरातून मान्यवरांनी केला सत्कार
लातूर दि. 18. राज्यातील जिल्हा बँकांत नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य सहकारी बँक्स असोसिएशन च्या वतीने नुकताच औरंगाबाद विभागीय स्तरावरील उत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून वैकुंठभाई मेहता पुरस्कार मिळाला असून त्याबद्दल राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी लातूर जिल्हा बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचा उदगीर कृषी बाजार समिती व आडत असोशीएशन यांच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सोमवारी आशियाना बंगल्यावर सत्कार करण्यात आला
याप्रसंगी उदगीर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, कोंग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड शिवाजीराव मुळे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव सौ उषाताई कांबळे, आडत व्यापारी असोशीशनचे अध्यक्ष श्रीधर बिराजदार, उपाध्यक्ष शिवशंकर बिराजदार, बाजार समितीचे संचालक अँड पद्माकर उगिले,प्रमोद पाटील, रवींद्र कोरे, जगदीश बाहेती, जीवन पाटील, दिलीप पाटील गौतम पिंप्रे, भरत दंडीमे, आडत असोशीशनचे साईनाथ कल्याणी, विकास देशमाने चंद्रकांत बिराजदार, संतोष बिराजदार, दत्ता सुरणर, उमेश पांढरे, नागेश अंबरखाने, शाम बिराजदार, माधव कांबळे संतोष बिराजदार, राजेश अंबरखाने यांच्यासह व्यापारी ,शेतकरी आडते, हमाल, उदगीर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते