अशोकराव पाटील मित्र मंडळाची बोरसुरी येथे मोठया उत्साहात शाखा स्थापन
निलंगा- अशोकराव पाटील मित्र मंडळाची बोरसुरी येथे मोठया उत्साहात शाखा स्थापना व नामफलकाचे अनावरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रा.रोहित बनसोडे,तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजी कदम,दापका ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा लाला पटेल,ग्राहक सेलचे तालुकाध्यक्ष भरत बियाणी,लहुजी क्रांती सेनेचे गोविंद सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,सध्या देशात अराजकता माजविण्याचा प्रकार होत असून जाती जाती मध्ये भांडणे लावण्याचे षडयंत्र रचले जात असून सामाजिक समतोल व माणसांमध्ये माणुसकी निर्माण करण्यासाठीच अशोकराव मित्र मंडळाची स्थापना करण्यात येत आहे.मागच्या निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधीने गावात आल्यास जाब विचारा,दिलेले कामे करता येत नसेल तर तुम्हला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले.यावेळी सिंदखेडचे मा.सरपंच अबरार देशमुख,केळगावचे अफसर पटेल,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर,बोरसुरीच्या सरपंच सौ.संजनाताई सूर्यवंशी,उपसरपंच श्री.पाटे,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते बाबुराव तोकले,व्यंकटराव पाटील,प्रताप माकने,मित्र मंडळाचे नूतन अध्यक्ष दत्तात्रय माने,उपाध्यक्ष विष्णू कुणाले,प्रशांत नरवटे,चंद्रकांत सोलापूरे,गोपाळ खरगे,व्यंकट सोलपुरे,शिंदे ज्ञानेश्वर,बाबू कासले,शीरगुरे व्यंकट,माणिक खरगे,पठाण बरकत,पाटे उद्धव,नरवटे मनोहर,महेश खरगे,व मित्र मंडळाचे सदस्य ,पदाधिकारी गावातील युवक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तुषार माकने यांनी केले.