किल्लारी कारखाना नवीन भाग विक्री शुभारंभ कार्यक्रम व शेतकरी संकल्प मेळावा संपन्न
किल्लारी:-सेवा पंधरवडाचे औचित्य साधून सभासदांच्या उपस्थितीत किल्लारी साखर कारखान्याचे “नवीन भाग विक्री, अपूर्ण भाग पूर्ण करून घेणे व मयत सभासदांचे भाग वारसांना वर्ग करणे” चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत किल्लारी कारखाना लवकरात लवकर सुरु करण्याचा संकल्प केला. “खासगीकरणाच्या माध्यमातून किल्लारी कारखाना सुरु करायला अनेक जण तयार आहेत पण हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्याच राहिला पाहिजे अशी माझी आणि भाजप – शिवसेना सरकारचीही भूमिका आहे. असे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले .कारखाना पुढील हंगामापासून सुरु करण्याचा मानस असून यासाठी केंद्र सरकारचीही मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे” असे मनोगत यावेळी आ.पवार यांनी व्यक्त करून २५२ गावांमधील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना सुरु होणं अत्यावश्यक आहे, त्यासाठी आपण सर्व जण सामूहिकपणे प्रयत्न करूयात अशी साद शेतकरी बांधवांना घातली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून “कारखाना सुरु करण्यासाठी शेतकरी जर २ पावले पुढे येत असतील तर सरकार ४ पावले पुढे येईल. कारखाना सुरु करण्याच्या प्रयत्नांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे” अशी ग्वाही सभासद व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना दिली. सहकार मंत्री अतुल सावे यांनीही व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून मेळाव्याला मार्गदर्शन केले.
यावेळी उमरगा – लोहारा चे सहकारी आमदार श्री ज्ञानराजजी चौगुले, कारखाना समिती सदस्य श्री पी आर फडणीस, श्री एस आर नाईकवाडी, श्री संताजीमामा चालुक्य, भाजप औसा तालुकाध्यक्ष श्री सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी श्री संतोष मुक्ता, श्री सुभाष पवार, श्री काकासाहेब मोरे, श्री ज्ञानेश्वर वाकडे, श्री संजय कुलकर्णी, श्री गुंडाप्पा बिराजदार, श्री युवराज बिराजदार, श्री जयपाल भोसले, श्री बंकट पाटील,श्री दीपक चाबुकस्वार, श्री महेश पाटील, श्री प्रकाश पाटील, श्री बाबासाहेब पाटील, श्रीमती ज्योतीताई हालकुडे, श्रीमती जयश्रीताई कांबळे, सहाय्यक उपनिबंधक श्री शिंदे, श्री रेडेकर, श्री राळे, कारखान्याचे सभासद, पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी, पत्रकार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.