गावातील विकास कामे गुणवत्तापूर्ण व वेळेवर करावीत
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या सूचना
खाडगाव, सिंकदरपूर व चांडेश्वर येथील विविध विकासकामांची केली पाहणी
सिंकदरपूर येथे 1 कोटी 18 लाख 98 हजार रूपये निधीची विकासकामे
खाडगाव येथे 1 कोटी 2 लाख 9 हजार रूपये निधीची विकासकामे
चांडेश्वर येथे 95 लाख 77 हजार 153 रूपये निधीची विकासकामे
लातूर (प्रतिनिधी ):-गावच्या मुलभूतसुवीधेसाठी सुरू असलेली विकासाकामे महत्वाची आहेत. यामुळे ही विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळवर करावीत. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही यासाठी संबंधीत यंत्रणेने या सर्व कामावर लक्ष दयावे, अशा सुचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सिंकदरपूर, खांडगाव व चांडेश्वर येथील विकासकामांच्या पाहणी प्रसंगी केल्या.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या व सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी स्वतः जावून केली. ग्रामपंचायत व इतर विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक यांच्याशी यावेळी संवाद साधला. गावात नव्याने विकास योजनांची आखणी करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, टवेन्टिवन शुगर कारखाना व्हा. चेअरमन विजय देशमुख, दगडूसाहेब पडीले, विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवी काळे, तानाजी फुटाणे, प्रताप पाटील, समद पटेल, रमेश पाटील, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके जिल्हा परिषदेच कार्यकारी अभियंता जयंत जाधव, शाखा अभियंता अरुणा उडते, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुभाष बुकसेटवार, शाखा अभियंता विठ्ठल बिराजदार, मनरेगा अधिकारी काकासाहेब जाधव, युनूस मोमीन आदी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख सिंकदरपूर येथे बोलतांना म्हणाले की, मला आपल्या आशीर्वादाने मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. गावच्या विकासासाठी तत्परतेने निधी आम्ही उपलब्ध करून दिला, ते सर्व काम कशी सुरू आहेत, या कामाची पाहणी केल्यानंतर चांगली कामे होत असल्याचे समाधान वाटल्याचे सांगितले. सामान्य माणसाचा उपयोगाला निधी आला पाहिजे अनेक काम झाली आहेत आणि अनेक राहिली आहेत, राहिलेल्या कामांनाही निधी दिला जाईल. संबंधित अधिकाऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण होतील याची खबरदारी घ्यावी. रस्त्यांची कामे चांगली करावीत काम चांगले झाले नाही तर संबंधितांची मी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गावाचा विकास करायचा आहे, गावातील रखडलेल्या कामाची चर्चा करावी. गावातील माणसे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या छत्राखाली तयार झालेले आहेत. लातूरच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न लोकनेते विलास देशमुख यांनी पाहिले ते आपणाला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे अधिकारी व आपण सर्वांनी ते काम टिकाऊ दर्जेदार करावे.
*सिंकदरपूर येथे 1 कोटी 18 लाख 98 हजार रूपये निधीची विकासकामे*
माजी मंत्री, आमदार आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विविध विकासकामांना निधी दिला आहे. या कामांची सिंकदरपूर गावात जाऊन पाहणी केली. संबंधितांना वेळेत व गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामध्ये गावात आमदार विकास निधी, जि.वा.योजना, जनसुविधाकरिता विशेष अनुदान, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजना, एमएसईबी विदयुतीकरण योजना, तांडावस्ती विकास योजना आदी योजनांमधून अंगणवाडी इमारत दुरुस्ती करणे, सार्वजनीक स्मशानभूमीचा विकास करणे, संरक्षण भिंत बांधकाम, विदयुत खांबावरील लाईन बदलणे, सिंगल फेस करणे, खांबावरील लाईन बदलणे, सिकंदरपूर ते कातपूर डांबरीपृष्ठासह नुतनीकरण करणे, अंतर्गत नाली सिमेंट काँक्रीट करणे, नवीन ग्रामपंचायत ईमारत बांधकाम, रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे, हनुमान मंदिर समोरील सांस्कृतिक सभागृह बांधकाम, वडारवस्ती येथे नाली बांधकाम आदी कामे करण्यात आली आहेत. याप्रसंगी सिंकदरपूर येथे सरपंच सौ रेश्माताई माधव गंभीरे, केशव गंभीरे, माधव गंभीरे, पिराजी इटकर, शिवाजी देशमुख, तुळशीराम गंभीरे, सहदेव मस्के आदीसह सिकंदरपुर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*खाडगाव येथे 1 कोटी 2 लाख 9 हजार रूपये निधीची विकासकामे*
लातूर शहरालगतच्या खाडगाव येथे जाऊन तेथे शहराच्या धर्तीवर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी १ कोटी २ लाख रुपये खर्चून राबवण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांची पाहणी केली. ग्रामस्थांच्या देखरेखीखाली अनेक कामे उत्तम झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत ती दर्जेदार पद्धतीनेच पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत. खाडगाव येथे जि.वा.योजना, जनसुविधेसाठी विशेष अनुदान योजना, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. सहाय्यक अनुदान योजना, एमएसईबी योजना, इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण योजना, ग्रामपंचायती नागरीसुविधेसाठी विशेष अनुदान योजना, यात्रास्थळांच्या विकासासाठी जिल्हा परिषद अनुदान योजना आदी योजनामधून विकासनीधी देण्यात आला आहे. या विकासनिधीतून प्राथमिक शाळा इमारतीची विशेष दुरुस्ती, गावातील रस्ते पेव्हर ब्लॉक करणे, सार्वजनीक स्मशानभूमीचा विकास करणे, विद्युतीकरण योजना अंतर्गत सिंगल फेस करणे, रोहीत्र बसविणे, रस्ता डांबरीपृष्ठासह नुतनीकरण करणे, नाली व रस्ता सिमेंट कॉर्किट करणे, सय्यद चाँदपीर बाबा दर्गा परिसरात पेव्हर ब्लॉक व सुशोभिकरण करणे ही विकासकामे करण्यात आहेत. माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी झालेल्या व सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. ग्रामपंचायत व इतर विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक यांच्याशी यावेळी संवाद साधला. गावात नव्याने विकास योजनांची आखणी करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी खाडगाव येथील कार्यक्रमास योगेश पाटील, सरपंच हेमा रमाकांत मगर, उपसरपंच सपना योगेश पाटील, सहदेव मस्के, ग्रामसेवक यु.एल. गोमसाळे, शरद देशमुख, हनमंत पवार, युनूस मोमीन, आयुब मनियार आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते खाडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
95 लाख 77 हजार 153 रूपये निधीची विकासकामे
लातूर-औसा महामार्गावर असलेल्या चांडेश्वर गावात सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने विविध विकास योजना राबविण्यात येत आहेत. मुलभूत सुविधा निर्माण करून गावच्या सर्वांगीण विकासात लक्ष देण्यात येत आहे. चांडेश्वर येथे 95 लाख 77 हजार 153 रूपये निधीची विकासकामे झाली आहेत. या विकासकामांची जाऊन पाहणी केली. ग्रामपंचायतींना जनसुविधाकरिता विशेष अनुदान, सामान्य विकास व पध्दती सुधारणेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी योजना, एमएसईबी योजना अंतर्गत रस्ता सिंमेट काँक्रीट करणे, डांबरीपृष्ठासह रस्ते नुतनीकरण करणे, रस्ता व नाली सिमेंट कॉक्रीट करणे. सार्वजनीक स्मशानभूमीमध्ये अंतर्गत संरक्षण भिंत बांधकाम करणे, प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या विशेष दुरुस्तीसाठी अनुदान, जि.प.शाळा 6 वर्गखोल्या दुरुस्ती, विदयुत रोहीत्र क्षमता वाढ, नवीन रोहीत्र बसविणे आदी विकासकामे झाली आहेत. या सर्व विकासकामांची पाहणी करून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी करून ती दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी चांडेश्वर येथे सरपंच शिवाजी गायकवाड, उपसरपंच जीवन गुंजर्गे, महेश नलवाडे, बाबा गायकवाड, सुबुद्दीन शेख, लक्ष्मण मोरे, कंत्राटदार विलास कदम, चांडेश्वरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.