माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी हरंगुळ (बु) एमआयडीसी परिसरातील नवीन म्हाडा कॉलनीची केली पाहणी
लातूर (प्रतिनिधी) शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३:राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी हरंगुळ (बु) एमआयडीसी परिसरात बांधण्यात येतअसलेल्या नवीन म्हाडा कॉलनीची पहाणी करून, इमारत बांधकामे, तसेच अंतर्गत
व्यवस्थांची कामे दर्जेदार करावीत. या परिसरात मूलभूत सोयी सुविधा तात्काळ उभारण्यात याव्यात अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या आहेत.
यावेळी म्हाडाचे लातूर शाखा अभियंता राजाभाऊ भोज,रमेश बिराजदार, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट किरण जाधव,लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल,ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख,विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे,संदेश शिंगोलिकर, काँग्रेस कार्यकर्ते प्रमोद जोशी, चांद शेख,अशोक यल्लाळे आदीसह म्हाडा कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.