मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार होते. त्यांच्या या दौऱ्यासाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व तयारी पूर्ण झाली होती. अमित शहा हे 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे येणार होते. मात्र अमित शहा यांचा हा दौरा आता रद्द झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी अमित शहा यांचे वेळेचे नियोजन होत नसल्यामुळे, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी भाजपकडून आणि प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्रमाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जय्यत करण्याची तयारी प्रशासन तसेच राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही दौरा निश्चित झाला होता. प्रशासनाने अमित शहा यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
निवडणुकीची तयारी
पुढील वर्षाच्या सुरूवातीलाच देशात सार्वत्रिक निवडणुका लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्ट्रीनेही अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व पक्षीय नेत्यांच्या दौऱ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यात भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांचा छत्रपती संभाजीनगरात दौरा ठरलेला होता. या दौऱ्याची संपुर्ण तयारी देखील पूर्ण झाली होती.
भव्य सभा घेण्याची तयारी
मुक्तिसंग्राम दिनानिमीत्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार होते. त्यामुळे निवडणुकीसाठी याचा उपयोग व्हावा, असे नियोजन स्थानिक भाजप नेत्यांनी केले होते. त्यासाठी एमआयडीसी चिकलठाणा भागात अमित शहा यांची भव्य सभा होणार होती. त्यानंतर ते विमानतळावरून विशेष विमानाने हैदराबादकडे रवाना होणार होते. सभेसाठी भाजपसह प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली होती.