माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून पवार कुटुंबाचे सांत्वन
लातूर -लातूर येथील शैक्षणीक संस्था संघटनेचे अध्यक्ष रामदास पवार यांचा मुलगा तथा युवक काँग्रेसचे पदाधिकारी किरण रामदास पवार यांचे नुकतेच निधन झाले त्याबद्दल बुधवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी पवार कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले
यावेळी रामदास पवार व त्यांचे कुटुंबातील सदस्य दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभिजित देशमुख जिल्हा बँकेचे संचालक अँड श्रीपतराव काकडे, रेणा साखर चे माजी चेअरमन यशवंतराव पाटील , रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, विकास बँकेचे उपाध्यक्ष अँड समद पटेल, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे,इंदिरा सूतगिरणी चे अध्यक्ष बाळासाहेब कदम उपाध्यक्ष धनराज पाटील,चांदपाशा इनामदार, सचिन दाताळ, हरिराम कुलकर्णी संभाजी सुळ, धनंजय शेळके, प्रकाश देशमुख, सतीश पाटील शिवाजी कांबळे, सगरे सर, प्रभाकर बंडगर, जाधव सर, शिवदास पवार, पाटील, वैभव नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते .