मराठवाडा विभागात लातूर जिल्हा बँकेला उत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून वैकुंठभाई मेहता पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांचा जिल्हा बँकेकडून सन्मान
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले बँकेच्या संचालक मंडळाचे कौतुक
लातूर -राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन कडून मराठवाडा विभागातून उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून लातूर जिल्हा बँकेला अत्यंत मानाचा समजला जाणारा वैकुंठभाई मेहता पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी आदरणिय दिलीपराव देशमुख यांचा जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्यासह संचालक मंडळाने मंगळवारी आशियाना बंगल्यावर शाल श्रीफळ देऊन सन्मान केला आभार व्यक्त केले जिल्हा बँकेची उत्तुंग कामगिरी व यशस्वी योजना राबवून आज राज्यात टॉप चार मध्ये असलेल्या जिल्हा बँकात लातूर बँक आहे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने वेगवेगळ्या योजना राबवून शेतकर्याना न्याय देत अद्यावत बँकिंग सेवा, ग्राहकांना मोबाईल व्हैंनद्वारें सेवा, उत्तम व्यवस्थापन यामुळे पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याबद्दल आदरणीय साहेब यांचे यावेळी बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख साहेब यांनी आभार व्यक्त केले यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर संचालक अशोक गोविंदपूरकर,
संचालक एन आर पाटील, संचालक व्यंकटराव बिरादार संचालक राजकुमार पाटील संचालक दिलीप पाटील नागराळकर, संचालक अनुप शेळके संचालक मारोती पांडे संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील,श्रीमती लक्ष्मीबाई भोसले संचालिका सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे बँकेचे स्वीकृत संचालक सी ए सुनिल कोचेटा, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव उपस्थित होते .
जिल्हा बँकेचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले कौतुक
राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा बँक अतिशय चांगले कार्य करत असून बँकेला पुरस्कार मिळाल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या .