महाराष्ट्र महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रिडा स्पर्धेत यश
निलंगा :-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, विभागीय केंद्र नांदेड यांच्या मार्फत विभागीय क्रिडा महोत्सव 2022 नांदेड येथे दि. 13/11/2022 रोजी आयोजित करण्यात आले होते. या क्रिडा महोत्सवात महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा या अभ्यासकेंद्राच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रिडाप्रकारात सहभाग घेतला.
कबड्डी पुरुष गटात जाधव राम तानाजी, सय्यद मीर जलील, कांबळे कृष्णा सुनिल या विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन विद्यापिठाच्या संघात स्थान मिळवले. कबड्डी महिला गटात कु. पुजारी श्रुती महेश, वाडकर संगीता श्रीहरी, माडीबोने निशा गणपती, धुमाळ शितल अनंत, नारायणकर नेहा महादेव, नरहरे शुभांगी बालाजी या विद्यार्थीनींनी कबड्डी स्पर्धेत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन विद्यापिठाच्या संघात स्थान मिळवले.
तसेच मुळे प्रेम राम याने 100 मीटर व 200 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. पुजारी श्रुती महेश हीने गोळाफेक या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. धुमाळ शितल अनंत हीने लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांची नांदेड विभागीय केंद्राच्या संघात निवड झाली असून नाशीक येथे विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समीतीचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, सचिव मा. बब्रुवान सरतापे, समन्वयक दिलीप धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड, क्रीडा संचालक डॉ गोपाळ मोघे, क्रीडा शिक्षक माधव कांबळे, सहाय्यक नामदेव गाडीवान, लीपीक गोविंद कांबळे, अभ्यासकेंद्राचे सर्व समंत्रक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सत्कार करुन कौतुक केले.