भारत जोडो यात्रेत अभय साळुंके यांचा राहुल गांधी यांच्याशी संवाद तरुणांना रोजगार व शेतकऱ्यांना बळ देण्याची मागणी
निलंगा (प्रतिनिधी) काॅग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी व संपूर्ण भारत देश एकसंघ करण्यासाठी काॅग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत च्या भारत जोडो यात्रेत हिंगोली जिल्ह्यातील पदयात्रे दरम्यान त्यांनी काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्याशी संवाद साधला. संवादात त्यांनी बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांच्या आडचणी विषयी चर्चा केल्याचे अभय साळुंके यांनी सांगितले. मागच्या कांही वर्षापासून देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काॅग्रेस पक्षाला एकप्रकारे मरगळ आल्याचे पाहायला मिळत होते. अनेक ठिकाणची सत्ता हातातून जाताना दिसत आसल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात पक्ष सोडला. काॅग्रेस पक्ष शिल्लक राहील का नाही वाटत असतानाच काॅग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत भारत जोडो पदयात्रा काढली अन काॅग्रेस पक्षात नवसंजीवनी निर्माण झाली. या यात्रेतून हजारोंच्या संख्येने लोक जोडले जात आहेत. या यात्रेमुळे काॅग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मरगळ झटकून जोरदार कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या यात्रेसाठी निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते अभय साळुंके यांच्यावर पदयात्रा रुट कमिटीची जबाबदारी देण्यात आली होती. या कमिटीत त्यांनी प्रभावी कामगिरी करत पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये आपली छाप पाडली. त्यामुळे त्यांना भारत जोडू यात्रेचे राज्याचे समन्वयक श्री बाळासाहेब थोरात यांनी काम करण्याची संधी दिली आहे. देगलूर येथील स्वागता पासुन ते सलग दहा दिवस राहुल गांधी यांच्या यात्रेत पायी चालताना दिसत आहेत. या यात्रे दरम्यान राहुल गांधी सामान्य नागरिकांपासुन पक्षातील मोजक्या पदाधिकारी व नेत्यांनी संवाद साधत आहेत. सोमवार (दि १४) रोजी सकाळी हिंगोली जिल्ह्य़ातील वसपांगरा ते चिंचळा पदयात्रा दरम्यान राहुल गांधी यांनी अभय साळुंके यांच्याशी जवळपास पंधरा मिनिटे संवाद साधला. या संवादाच्या दरम्यान अभय साळुंके यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना पीक विमा कंपनी प्रत्येक वर्षी जवळपास ५ हजार कोटी रुपये वीम्याची रक्कम जमा करते व केवळ १००० ते १२०० कोटी रुपये रक्कम वितरीत करते केंद्र सरकार वीमा कंपणीच्या नावाखाली उद्योगपतींना हाताशी धरून लूट करत आहे. काॅग्रेस पक्षाने सुरु केलेली रोजगार हमी योजना अधिक व्यापक बनवून शेतीकामाचा समवेत जर मनरेगा मध्ये केला तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना आधार मिळेल त्याचबरोबर तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी काॅग्रेस पक्षाच्या वतीने प्रोग्राम राबविण्यात यावा अशी मागणी अभय साळुंके यांनी करत भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशातील आठरा पगड जाती धर्मातील लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून निश्चित येणाऱ्या काळात देशात बदल दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला. विलासराव देशमुख साहेबांचा लातूर जिल्हा विरोधी वातावरणाही दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजीमंत्री आ अमित देशमुख व आ धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अभेद्य असुन आगामी सर्व निवडणुकात काॅग्रेस पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे राहुल गांधी यांना सांगताच तुम्हच्या सारख्या तरुणांच्या मागे पक्ष नक्की ताकद उभी करेल असे अश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याचे साळुंके यांनी सांगितले. दरम्यान यात्रेत चालत असलेले काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अभय साळुंके यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचे समर्थन करत साळुंके यांचे कौतुक करत गळाभेट घेतली. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांचे मनने ऐकून घेतले हिच तर खरी काॅग्रेस पक्षाची ताकद आसल्याचे अभय साळुंके म्हणाले.