सामाजिक बांधिलकी स्वीकारुन सेवानिवृत्तांनी कार्य करावेःअजय ठक्कर
लातूर:- सेवानिवृत्त कर्मचार्यांनी आपला स्वतःचा संसार सांभाळत सांभाळत सेवानिवृत्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी तर प्रयत्न करावे तद्वतच सामाजिक बांधिलकी स्विकारुन सामाजिक कार्यातही आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन उद्योजक अजय ठक्कर यांनी येथे केले.
हॉटेल आरोमा येथे दि.१५ नोव्हेंबर रोजी मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्यावतीने सेवानिवृत्तांचा विभागीय मेळावा घेण्यात आला.त्यावेळी अध्यक्षपदावरुन अजय ठक्कर बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.गजानन भातलवंडे यांच्या हस्ते करण्यात आले.मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, कोषागार अधिकारी रामकिशन राऊत, अपर कोषागार अधिकारी संतोष धुमाळे हे उपस्थित होते.
सदरील मेळाव्या प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष प्रा.अनंत लांडगे यांनी केले.सूत्रसंचालन प्राचार्य विजयकुमार श्रंगारे यांनी केले.शेवटी मोहन कांबळे सेलूकर यांनी आभार मानले.या मेळाव्याला मराठवाडा अध्यक्ष बलभीम कोथिंबीरे, लातूर जिल्हाध्यक्ष एस.टी.मस्के,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अरुण बनसोडे, जिल्हा सचिव ऍड.सुदेश माळाळे, अहमदपूर तालुकाध्यक्ष मनेाहर गायकवाड, लातूर तालुकाध्यक्ष चिंतामणी सवई, लातूर शहराध्यक्ष पी.एस.कांबळे, प्रा.कल्याण कांबळे, विनायक बोरीकर, इंजि.ए.आर.लामतूरे, ए.बी.कांबळे, एस.एस.धसवाडीकर, इंजि. सुधाकर दंदाडे,इंजि.एम,एन.गायकवाड, माजी सह आयुक्त भालचंद्र गवळी,माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.करडखेलकर,मॅनेजर एम.एच. सांगर, माजी शिक्षणाधिकारी दामोदर सोनङ्गुले, माजी प्रबंधक एल.एच.कंाबळे, राजेंद्र बनसोडे, भारती लामतूरे, लक्ष्मी सोनवणे, लक्ष्मण धोत्रे, के.डी.कांबळे, रमेश श्रंगारे, श्रीमंत कांबळे, दिलीप जाधव, शिक्षक नेते गौतम टाकळीकर, शिक्षक नेते जे.जे. गायकवाड, इत्यादीसह लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.