श्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज 12 सप्टेंबर रोजी स्पेन आणि दुबईच्या 11 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. दुबईत रात्रभर मुक्काम केल्यानंतर ममता बुधवारी सकाळी स्पेनची राजधानी माद्रिदला जाणार आहेत.तिथल्या तीन दिवसांच्या बिझनेस समिटमध्ये त्या सहभागी होणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांच्यासोबत माद्रिदमध्ये सामील होणार आहे. यानंतर ममता अनिवासी बंगालींचीही भेट घेणार आहेत.तीन दिवसांनंतर ममता बार्सिलोनामध्ये बंगाल ग्लोबल बिझनेस समिट (BGBS) च्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होतील. ममता यांच्या परदेश दौऱ्याबाबत त्या राज्यात गुंतवणूक आकर्षित करणार असल्याचे बोलले जात आहे.ममता यांच्यासोबत बंगालचे मुख्य सचिव एच के द्विवेदी आणि कोलकाता फुटबॉल क्लब मोहन बागान, ईस्ट बंगाल आणि मोहम्मडन स्पोर्टिंगचे वरिष्ठ अधिकारीही परदेश दौऱ्यावर गेले आहेत.
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना ममता यांनी दिल्या
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी ममतांनी बंगालच्या जनतेला त्यांच्या अनुपस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना शांतता राखण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.