मराठा आरक्षणासाठी लातूरात उपोषण संभाजी ब्रिगेडचा सक्रिय पाठींबा
लातुर/ प्रतिनिधी मराठा ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रभर गावोगावी उपोषण सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील अदित्य देशमुख हा तरुण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातूर तहसिल समोर गेली सहा दिवसापासून आमरण उपोषण करत आहे त्याची तब्येत बिघडली आहे त्यास संभाजी ब्रिगेड लातूर टीमने उपोषणास सहभागी होऊन जाहीर पाठींबा असल्याचे पत्र देऊन शासनाने . मराठा आणि कुणबी एकच आसल्याचे 1956 पुर्वीचे शेकडो पुरावे लातूर जिल्ह्यात भिसे वाघोली परिसरात सापडले आहेत तेव्हा ताबडतोब सरसकट मराठा समाजास ओबीसी आरक्षण घोषीत करावे आणी महाराष्ट्रातील उपोषणाला बसलेल्या हजारो आंदोलकांचे प्राण वाचवावेत. अन्यथा स्फोटक परिस्थिती निर्माण होईल असा इशारा देन्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक उमाकांत उफाडे. वि.उपाध्यक्ष वैजनाथ जाधव. महानगर अध्यक्ष मिथुन दिवे. जिल्हा सचिव रफिक शेख. तालुकाध्यक्ष अॅड मनोजकुमार नरवडे. गजानन जाधव. शाहुराज लोभे. अशिष अजगरे. कुंडलिक पाटील. अॅड ज्ञानेश्वर महाडक. धनराज कदम यांच्या सहित शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.