डॉ. सतिश सातपुते यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान
निलंग्याचे सुपुत्र, डायटचे माजी विषय सहाय्यक आणि सध्या जि. प. कन्या प्रशाला, शासकीय वसाहत लातूर येथे कार्यररत असलेले डॉ. सतिश सातपुते यांना महाराष्ट्र शासनाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन दि.5 सप्टेंबर 2023 रोजी टाटा थिअटर, नरिमन पॉईंट मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमांस मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, शिक्षण मंत्री मा. दिपक केसरकर, प्रधान सचिव मा. रंजितसिंह देवोल, शिक्षण आयुक्त मा. सूरज मांढरे, शिक्षक आमदार मा. विक्रम काळे,शिक्षक आमदार आमदार मा. गोणारकर, शिक्षक आमदार मा. कपिल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. सतिश सातपुते यांनी माहिती तंत्रज्ञान व डिजिटल साधनांच्या वापर या विषयावर सखोल संशोधन केले असून त्यांना पीएच डी मिळाली आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे अध्यायन-अध्यापनामध्ये विशेष कौशल्य त्यांनी साऱ्या राज्याला दाखवून दिले, श्री सातपुते यांच्या सेवा काळात अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी विशेष प्रयत्न,ऑनलाईन टेस्ट घेऊन सराव. देशपातळीवर वापरल्या जाणाऱ्या दीक्षा ॲप्लिकेशनच्या निर्मितीमध्ये विशेष सहभाग घेऊन योगदान दिले, झूम अप्लिकेशन च्या मदतीने मीटिंग घेता येते याचा 2015 साली प्रयोग करणारा महाराष्ट्र राज्यातील पहिला अवलिया शिक्षक, 2011 साली निलंगा तालुक्यातील शिक्षकांचे पेपरलेस पद्धतीने कामकाज करण्यासाठी राज्यातील पहिली वेबसाईट निर्मिती केली, विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन केल्याने राज्यस्तरावर सतत पाच वर्ष उपक्रमशील शिक्षक म्हणून गुणगौरव, क्षेत्रभेटीद्वारे विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यावर अधिक भर, कोविड 19 काळामध्ये “शाळा बंद पण शिक्षण सुरू” हा उपक्रम राज्यस्तरावरून संबंध राज्यभर चालवणारा शिक्षक, तंत्रज्ञानाद्वारे अध्ययन अध्यापन या शोधनिबंधात राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्रदान, विद्यार्थी सामान्य ज्ञानामध्ये अग्रेसर राहण्यासाठी विशेष उपक्रम. लातूर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने तयार केलेल्या वेबसाईट निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग, वर्ग अध्यापनात तंत्रज्ञान वापर या विषयावर राज्य व जिल्ह्यातील जवळपास आठ हजार शिक्षकांना तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक, रोटरी क्लब, लायन्स क्लब यासारख्या विविध सामाजिक संस्थांकडून शाळा व शैक्षणिक क्षेत्रासाठी भरपूर निधी उपलब्ध करून घेतला. त्यांनी विविध विषयावर साहित्य व संशोधनपर लेखन केले आहे. वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, अवयव दान, रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण आणि यासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग. या व अशा अनेक उपक्रमांची दखल घेऊन राज्यशासनाने त्यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.