खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविकांसह काँग्रेस व भाजपाच्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत लातूरच्या माजी नगरसेविकांसह काँग्रेस व भाजपाच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार ,राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका सुमन ज्ञानोबा गायकवाड, माजी युवक काँग्रेस पक्षाचे लातूर शहर कार्याध्यक्ष रघुनाथ मदने, युवक शहर उपाध्यक्ष सलीम घंटे, भाजपचे पदाधिकारी नवीद आरिफभाई सिद्दीकी, युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत संभाजी अनेराये , तुकाराम बालाजी चपटे यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग लातूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते रघुनाथ मदने यांना देण्यात आले. या निवडीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर,लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार,प्रदेश सचिव संजयजी शेटे ,लातूर जिल्हा निरिक्षक डॉ.नरेंद्र काळे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक कार्याध्यक्ष चंदन बसवराज पाटील नागराळकर, युवक प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे, प्रा.प्रशांत घार,महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई कदम, कार्याध्यक्षा मनिषा कोकणे, माजी नगरसेविका छायाताई चिंदे, युवक शहराध्यक्ष समीर शेख, प्रसिध्दी प्रमुख डी.उमाकांत, जाकीर तांबोळी,युवा नेते सिद्धार्थ (आबा )सूर्यवंशी, खंडू लोंढे, तोसिफ शेख,शाहरूख पठाण,आदर्श उपाध्ये यांच्यासह शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.