काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या `भारत जोडो`, यात्रेची चर्चा जगभर झाली. (Bharat Jodo News) आज या यात्रेची वर्षपुर्ती आहे. या निमित्ताने या यात्रेचा एक भाग असलेले आणि महाराष्ट्रातील प्रवासाचे साक्षीदार ठरलेले नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यात्रेच्या आठवणीला उजाळा दिला आहे.ASHOK CHAVHAN यांनी या संदर्भात ट्विट करत `भारत जोडो` ने कोट्यवधी ह्रदये एकत्र केल्याचे म्हटले आहे. १४५ दिवस, १२ राज्ये, २ केंद्रशासित प्रदेश आणि ४०८१ किमी – भारत जोडो यात्रेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पाथब्रेकिंग चळवळीने कोट्यवधी ह्रदये एकत्र केली आणि एकता आणि सौहार्दाकडे वाटचाल करायला शिकले.अब्जावधी-सशक्त राष्ट्राच्या हृदयाला प्रेमाने भरून टाकणारी ही यात्रा ठरली, अशा भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या देशातील सद्य परिस्थिती, राजकीय वातवरण आणि CONGRESS ला मिळणारा पाठिंबा यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा सिंहाचा वाटा आहे.देशातील सर्वात शक्तीशाली पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या सत्तेला काही राज्यांमध्ये हादरे देण्याचे काम देखील `भारत जोडो` च्या माध्यमातून झाले. कर्नाटक राज्यात भाजपच्या सत्तेला सुरुंग हा या यात्रेचाच परिणाम होता. सध्या भाजपविरोधात देशपातळीवर स्थापन झालेल्या `इंडिया` आघाडीचा अंजेडा देखील `भारत जोडो` यावरच आधारित आहे.