मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटे या गावात सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा म्हणून बीड जिल्ह्यात आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. आज गुरुवारी मध्यरात्री गेवराईत बस जाळली आहे. तर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये चक्काजाम सुरु आहे. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर मराठा क्रांती मोर्चाच्या आवाहनाने आंदोलन सुरु आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलेल्या मराठा समाज बांधवांवरील लाठीहल्ल्याचे सर्वप्रथम पडसाद बीड जिल्ह्यात उमटले होते. लाठीमाराचा निषेध व आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात सहा दिवसांपासून डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथे उपोषण सुरु आहे.
पिट्टी नायगाव येथील उपोषणालाही पाच दिवस होत आहेत. कारी (ता. धारुर) येथे साखळी उपोषण सुरु आहे. तर रोज दोन – तीन गावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची अत्यंयात्रा काढली जात आहे.दरम्यानमराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाने हाक दिली आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे ठिकाण व मोठ्या बाजारपेठांच्या गावांतील रस्त्यांवर आंदोलन सुरु आहे. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात आहे. सकाळी १० वाजल्यापासून आंदोलनामुळे जिल्ह्यात वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. दरम्यान, मराठा समाजातील तरुण मुंडन करुनSARKAR निषेधही करत आहेत.