चंद्रावर यान उतरले अन् वाहिन्यांवर यानाच्या शेजारी पंतप्रधानांचा फोटो झळकला. जणू काही यांनीच यान तीथे नेले?. या शब्दांत काँग्रेसचे विधीमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली. येत्या २०१४ मध्ये केंद्रात हमखास परिवर्तन होईल. जनता भाजपची सत्ता उखडून फेकणार आहे. लोकशाही मुल्ये आणि देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी हे करावेच लागेल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी श्री. थोरात म्हणाले, नाशिक आणि काँग्रेसचे प्रदिर्घ असे नाते आहे. एकेकाळी येथील सर्व खासदार काँग्रेसच्या विचाराचे असत. १९६२ च्या चीनने भारतावर आक्रमण केल्यावर पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला पाचारण केले, तेव्हा त्यांना बिनविरोध खासदार म्हणून निवडून देणारा हा जिल्हा आहे.
अंतकरणापासून काँग्रेसचा विचार स्विकारणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे जे जुने नाते होते, काम होते, ते पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मनापासून कामाला लागावे.ते पुढे म्हणाले, आज देशात काय पद्धतीने सत्ताधाऱ्यांचे राजकारण सुरू आहे, हे सांगण्याची गरज आहे. या सरकारच्या कामाची दिशा काय आहे?. कोणत्या दिशेने केंद्रातील सरकार जात आहे?. भविष्यकाळात लोकशाही राहणार की नाही?, राज्यघटना राहणार की नाही?, असा प्रश्न पडतो.मतदारांनी जागरूक व्हावे असे आवाहन करताना ते म्हणाले, महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली. समता, लोकशाही हे तीचे मुलभूत तत्व आहे, सर्वांना समान न्याय्य त्यात आहे. जगाची राज्यघटना निर्माण केली तर आपलीच राज्यघटना स्विकारली जाईल अशी स्थिती आहे.ते म्हणाले, या राज्यघटनेवर हल्ले होताना दिसते. या राज्यघटनेने आपल्याला लोकशाही आणि मताचा अधिकार दिला. निवडणूक आल्यावर कितीही मोठा नेता असो, त्याला मतदारांच्या दारात जावे लागते. मतदाराला त्याला आमच्या कामाचे काय झाले, हे विचारण्याचा अधिकार मिळाला आहे.मराठा आंदोलकांवर अमाणूष लाठीमार, वारकऱ्यांवर लाठीमार, दिल्लीत शेतकऱ्यांवर अत्याचार, महिला कुस्तीपटूंच्या आंदोलकांवर पोलीसबळाचा वापर ही भाजपची कोणती निती आहे, असा प्रश्न करून ते म्हणाले, आमच्या विरोधातील कोणताही आवाज आम्ही सत्तेचा वापर करून दाबून टाकू ही भाजपची निती आहे.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, सचिव राहुल दिवे, राजीव वाघमारे, आमदार वजात मिर्झा, हनिफ बशीर, आमदार हिरामण खोसकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, अहमद खान, डॉ. जफर खान, स्वाती जाधव, वत्सला खैरे, ज्ञानेश्वर काळे, स्वप्नील पाटील, इम्रान पठाण यांच्यासह जुन्या नाशिक भागातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.