बाभळगाव येथील पाझर कालवातून भरून वाहून जाणारे पाणी आरसीसी पाईपद्वारे तलावात सोडण्याच्या कामाचा शुभारंभ
पाणी हे जीवन आहे पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. ही बाब समोर ठेऊन लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून बाभळगाव येथे साकार झालेला पाझर कालवा भरून वाहून जाणारे पाणी योजना साकार झाली आहे. बाभळगाव येथे पाझर कालवा भरून वाहून जाणारे पाणी योजनेतून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आरसीसी पाईपद्वारे तलावात सोडण्याची सूचना केली होती, यासाठी बजेटही मंजूर केले. मंगळवार दि. ५ सप्टेंबर रोजी पाझर कालवा भरून वाहून जाणारे पाणी आरसीसी पाईपद्वारे तलावात सोडण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच गोविंद देशमुख, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पी.ए. सय्यद, जलसंधारण अधिकारी ए. एन. पस्तापुरे, के झेड शेख, सचिन मस्के, युवक
काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळ थडकर, अशोक नाडागुडे, बब्रुवान बोयणे, राजपाल देशमुख उपस्थित होते.