लोकमान्य शिक्षण संस्थेच्या अटीतटीच्या निवडणुकीत विक्रम पाटील यांचे पॅनल विजयी
तणावपूर्ण शांततेत निवडणूक पार पडली
निलंगा/पानचिंचोली (दि.३):निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील लोकमान्य शिक्षण संस्थेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली या निवडणुकीत विक्रम पाटील यांच्या लोकमान्य विकास पनल चे सर्व उमेदवार विजयी झाले. पानचिंचोली पंचक्रोशीतील जुनी व मोठी शिक्षण संस्था म्हणून लोकमान्य शिक्षण संस्थेची ओळख आहे. या संस्थेवर वर्चस्वासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव अभय साळुंके व विक्रम पाटील यांच्या पनल मध्ये लढत झाली. दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत संस्थेच्या ११३ सभासदापैकी १११ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात अध्यक्षपदासाठी विक्रम पाटील यांनी ७२ मते घेत विजयी झाले. तसेच लोकमान्य विकास पनल चे शिवाजी जाधव शिक्षक प्रतिनिधी, पंचाक्षरी स्वामी, बालाजी पाटील, गोविंद दिवे, विजय स्वामी, नागनाथ स्वामी, लक्ष्मण बंडगर, मारूती कदम, दत्तात्रय जगदाळे, लिंबराज मोरे हे सर्व संचालक विजयी झाले.
या निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एन जी लोंढे यांनी काम पाहिले तसेच निवडणुकीत काही काळ तणाव निर्माण झाल्याने निलंगा पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गोविंद राठोड, उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे, तसेच पोलीस जमादार सुनील पाटील आदींसह १० पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थित चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावकरी व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच उमेदवाराची जेसीबीतून गुलाल उधळत व फटाक्यांची आतषबाजी करत विजयी मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला.यावेळी सत्यप्रकाश होळीकर, चंद्रकांत स्वामी, भाऊसाहेब पाटील, गोपाळ जाधव, मधुकर शामराव जाधव, शांतवीर स्वामी, दस्तगीर सय्यद, गुंडेराव जाधव, नागनाथ पवार, पाशा सय्यद, रमेश जाधव, नेताजी पाटील, विश्वजीत पाटील, विशाल पाटील, विकास पाटील, डॉ. सुधीर स्वामी, संजय स्वामी, बापु हणमंते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.