• Wed. Apr 30th, 2025

सकल मराठा समाजाच्या वतीने लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन शांततेत संपन्न

Byjantaadmin

Sep 4, 2023
सकल मराठा समाजाच्या वतीने लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन शांततेत संपन्न
लामजना / प्रतिनिधी, सकल मराठा समाजाच्या वतीने लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन शांततेत संपन्न जालना येथील आंदोलन मराठी बांधव व महिलावर झालेल्या लाठी चार व गोळीबाराचे पडसाद लामजना पाटी येथे पाहायला मिळाले लामजना पाटी येथे मराठा समाज आक्रमक होत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलक बांधवांवर झालेल्या अमानुष लाठीच्या चार्ज च्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको करून सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी मराठा बांधवांनी आक्रमक आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन केले हे सरकार जर मराठा समाज बांधवांवर लाटी काठीची भाषा करणार असेल तर जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही  आंदोलकांनी दिला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सूरवसे आंदोलनाला संबोधित करताना म्हणले की…परवाच जालना येथील मनोज झुरंगे पाटलाच्या संविधानिक पद्धतीने शांतते त आंदोलन चालू असताना अशाच संविधानिक पद्धतीने त्याला उत्तर मिळेल अशी अपेक्षा असताना या मराठ्याच्या विरोधात असलेल्या सरकारनं मराठा दृष्ट्या सरकारने हे आंदोलन मुघलशाही पद्धतीने दडपण्याचा प्रकार केला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आज शेतकऱ्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या पीक विमा संदर्भात प्रश्न असेल मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात प्रश्न असेल हे प्रश्न अजून अनुत्तरीत आहेत
 आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सपशेल अयशस्वी ठरलेल आहे याची नैतिकता ठेवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आत्तापर्यंत महाराष्ट्र मध्ये एकूण ५८ मूक मोर्चे निघाले कसल्याही पद्धतीचा गालबोट या मोर्चाला लागलेलं नव्हतं पण काल या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या आणि गृहमंत्र्याच्या आदेशावरून शांतताप्रिय आणि संविधानिक पद्धतीने चालू असलेला आंदोलन मोगलशाही पद्धतीने चिरडण्याचा प्रकार या सरकारने केलेला आहे मी आपल्या माध्यमातून या सरकारला एवढेच जाणीव करून देऊ इच्छितो मराठा हा फक्त निवडणुकीपुरताच वापरता का मराठ्यांचा वापर निवडणुकीमध्ये होतो का मराठ्यांचा वापर हा सीमेवर युद्धासाठीच होतो का मराठ्यांचा वापर हा देश सेवेसाठीच होतो का समाज बांधवांना इतर सुविधा देण्यासाठी तुमचे हात का थरथरत  आहेत व जालना येथील पोलीस अधिकाऱ्यांना सत्तेची एवढी मस्ती चढलेली आहे का की आमच्याच माता भगिनीचे डोके फोडतात मराठा समाज बांधवांचे डोके फोडतात पण मराठा समाज शांत संयमी आहे यांचा आंत पाहूनका अन्यथा माझा मराठा समाज हातात दांडके फावडे घेऊन चढलेला सत्तेचा माज काही क्षणात उतरवेल संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाज आज वाट पाहतोय ते फक्त निवडणुकीची या निवडणुकीमध्ये ईट का जवाब पत्थर से मिलेगा यापुढे माझ्या महाराष्ट्रातल्या एकाही मराठा मराठा बांधवावर एकही काठी पडली तर अखा महाराष्ट्र पेटवून काढू असे उद्गार यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काढले त्याचबरोबर शिवसेना उजिल्हाप्रमुख बजरंग दादा जाधव,संजय लोंढे, सचिन आणसरवडे, रवि निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले शांत संयमी असलेल्या मराठा समाजाला शांततेत मूक मोर्चा काढू द्यावेत शांततेत आंदोलन करू द्यावे व लवकरात लवकर मराठा समाज बांधवाला आरक्षण मिळवून द्यावे असे आव्हाने या ठिकाणी करण्यात आले यावेळी उपस्थित लामजना, जावळी, तांबरवाडी,  मोगरगा, वाघोली, उत्का, चलबुर्गा, कीनी नवरे, शिवणी, गावातील सकल मराठा समाजाचे समाज बांधव तसेच मुस्लिम समाजाचे समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *