एक राखी सैनिकांसाठी उपक्रम
निलंगा: जीवनदिप बहु उद्देशिय शैक्षणिक सेवाभावी संस्थेने एक राखी सैनिकांसाठी उपक्रम राबवला.या उपक्रमाअंतर्गत निलंगा शहरातील माता, भगिनीं यांनी राख्या जमवल्या. आणि त्या राख्या भारत पाकिस्तान सीमेवरील जम्मु काश्मीर येथील जवानांना पाठवन्यात आल्या.रक्षा बंधन सण आपल्या भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांसोबत साजरा करन्यात आला. आपल्या सैनिकांना या सणासाठी गावाकडे येणे होत नाही. भारत मातेची रक्षा करण्यासाठी ते सिमेवर असतात.या उपक्रमासाठी संस्थेचे गुरूनाथ महालींगप्पा मोहोळकर, मल्लिनाथ मोहोळकर,सोमनाथ मोहोळकर,डॉ. सतीश जाधव, स्वामी कार्तिक, सागर नाईक,हरिभाऊ टोंपे,परमेश्वर पाटील,महेश जाधव,कोरे शिवाजीकरण सोळुंके ,सागर नाईक ,अविनाश पुजारी , निसार तांबोळी, श्रीराम कुंभार, विठ्ठल पाटील यांनी सहकार्य केले.