महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आयोजीत बॅडमिंटन स्पर्धेचा मांजरा आयुर्वेद महाविद्यालयात शुभारंभ
राज्यभरातून 35 मेडिकल महाविद्यालयातून 160 विद्यार्थ्याचा सहभाग
लातूर -महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित कै.बी. व्ही काळे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय द्वारा आयोजित ऐ.आय. यू बॅडमिंटन स्पर्धचा सुशीलादेवी वरिष्ठ महाविद्यालय खाडगाव रोड येथील बॅडमिंटन कोर्ट येथे रविवारी सुशीलादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अजय पाटील कै बी. व्ही. काळे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला तत्पूर्वी धन्वंतरीचे पूजन तसेच लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास विद्यापीठ निवड समिती सदस्य प्रा.संजय देवरे प्रा.अमित कदम, झोन समन्वयक प्रा गिरीश भोवरे प्रा संजय वाटणे. बॅडमिंटन असोसिएशन चे श्री सुशांत घाडगे तसेच विविध संघाचे व्यवस्थापक डॉ जावेद सिद्दीकी , प्रा संजय माने प्रा. बळीराम फाळके प्रा.चेतन कस्तुरे प्रा.तेजस कुलकर्णी प्रा रूपेश रूपवते आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम प्राचार्य डॉ अजय पाटीलयांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तसेच मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धा आमच्या कॅम्पस मध्ये होतात याचा आनंद आहे असे सांगून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे भविष्यात सुद्धा सहकार्य राहील असेही ते यावेळी म्हणाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आनंद पवार यांनी बोलताना सांगितले की गेली 15 वर्षापासून विद्यापीठाच्या विविध स्पर्धा आयोजित करावयाचा मान कै. बी. वि. काळे आयुर्वेद महाविद्यालयाला मिळतो मागच्या वर्षी सर्व अथलेटिक्स निवड स्पर्धा महाविद्यालय द्वारा आयोजित केल्या गेल्या होत्या .मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या आदेशाने मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय दर्जाचे अतिशय अद्यावत असे बॅडमिंटन कोर्ट याठिकाणी कार्यान्वित झाले आहे त्यामुळे मोठ्या स्पर्धा याठिकाणी होतात असे मत व्यक्त करुन महाविद्यालयाची स्पर्धा भरविण्यासाठी निवड केल्याबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय डॉ माधुरी कानिटकर मॅडम आणि प्रो कुलगुरू डॉ. निकुंभ सर यांचे आभार व्यक्त केले .
याप्रसंगी विद्यापीठ निवड सदस्य प्रा. देवरे सर यांनी आवर्जून सांगितले की महाराष्ट्रात विद्यापीठ द्वारा बॅडमिंटन स्पर्धा घेण्याचा विषय जेव्हा येतो तेव्हा केवळ बी व्ही काळे मांजरा आयुर्वेद महाविद्यालय लातूर येथील बॅडमिंटन कोर्ट लक्षात घेतले जाते आणि एकमुखाने येथेच स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला जातो तसेच मांजरा आयुर्वेद महाविद्यालय द्वारा स्पर्धेसाठी उत्तम व्यवस्था केली जाते हे ही नमूद केले या स्पर्धेसाठी 160 च्या वर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या स्पर्धा दोन दिवस चालणार आहेत यातून निवडण्यात येणारे संघ हे राष्ट्रीय स्तरावर आंतरराज्य स्पर्धेत खेळणार आहेत.या संपूर्ण कार्यक्रमाची आणि स्पर्धेची जबाबदारी क्रीडा शिक्षक श्री शिवाजी कदम हे पार पाडत आहेत या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ जावेद सिद्दीकी यांनी केलेया कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले..