काँग्रेसच्या विधी विभागाच्या नुतन पदाधिकाऱ्यांनी घेतले सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन
नूतन विधी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले कार्य करावे-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर दि.०4.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधी विभागाच्या वतीने काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी, काॅंग्रेसचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जुनजी खर्गे, काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी, भारताचे माजी गृहमंत्री शिवराज्य पाटील चाकूरकर सहकार महर्षी तथा माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख , प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले ,विधिमंडळाचे नेते बाळासाहेबजी थोरात,विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार,माजी मंत्री तथा लातूर शहरचे आमदार अमितभैय्या देशमुख व लातूर ग्रामीण चे आमदार धिरजभैय्या विलासरावजी देशमुख,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधी विभागाचे अध्यक्ष अॅड.रवी प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्यदादा उटगे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांच्या शुभहस्ते विधी विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना काॅंग्रेस भवन येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. याबद्दल आशियाना येथे सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांचे लातूर जिल्हा काँग्रेसच्या विधी विभागाचे नुतन अध्यक्ष अँड प्रवीण हणमंतराव पाटील, लातूर शहर विधी विभागाचे नुतन अध्यक्ष अॅड.सचिन पंचाक्षरी महाराष्ट्र प्रदेश विधी विभागाचे नुतन सचिव अॅड .राजेंद्र काळे व महाराष्ट्र प्रदेश विधी विभागाचे नुतन सचिव अॅड .दौलत दाताळ यांनी भेट घेऊन आभार व्यक्त केले व मार्गदर्शन घेतले.
यावेळी लातूर ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार अॅड. त्र्यंबकनाना भिसे,महाराष्ट्र राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतरावजी बाजूळगे, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माध्यम विभागाचे सरचिटणीस हरीराम कुलकर्णी,जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष सुपर्ण जगताप, संभाजीराव सूळ, रेणा साखरचे संचालक संभाजी रेड्डी,स्नेहल देशमुख, मांजरा चे संचालक बंकट कदम, सचिन पाटील रामदास पवार , दयानंद बिडवे, सतीश पाटील वडगावकर चेअरमन बालाजी भोसले, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ शिवाजी कांबळे, अॅड सुनील गायकवाड,अॅड हंसराज सोमवंशी, अॅड.सागर वाघमारे, अॅड शरद पवार, अॅड.संदिप मोरे, विकास देशमुख, अजय कोद्रे, सुनील गुरनाळे,रमेश देशमुख, बप्पा मार्डीकर विजय कदम,अमोल भिसे,राहुल देशमुख आदी उपस्थित होते.