• Wed. Apr 30th, 2025

समाजकंटक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायत – एकनाथ शिंदे

Byjantaadmin

Sep 3, 2023

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा येथे आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले. शुक्रवारची घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले. जालन्यामध्ये दगडफेक कोणी केली हे पाहावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले? लाखा-लाखांचे मोर्चे निघाले. 58 मूक मोर्चे निघाले होते. लोक याला विसरणार नाहीत. पण, आता राजकारण सुरु आहे. मराठा समाज संयमी आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे समाज कधीही करणार नाही. त्यामुळे दगडफेक कोणी केली हे पाहावे लागले. कोणी नेते, समाजकंटक जातीय सलोख बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत का याची माहिती येत आहे, असे शिंदे म्हणाले.

3 दिवसांपूर्वीच चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मी 3 दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना फोन केला होता. तू उपोषण करून को. तुझी तब्येत ठीक नाही. आपण चर्चा करू, असे मी त्यांना सांगितले होते. पण तरीही त्यांनी उपोषण केले, असे सांगतानाच आंदोलकांवर लाठीमार झाल्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मी सक्तीच्या रजेवर पाठवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जालनामध्ये घडलेल्या घटनेची गरज लागल्यास न्यायालयीन चौकशी होणार असून तिथले पोलिस अधीक्षक तुषार दोषा यांना मी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाला. बुलडाण्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

शिंदे काय केल्या घोषणा?

यावेळी मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या. आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे, डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल, आदी मोठ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed