• Tue. Apr 29th, 2025

राजकीय पक्षांनी ‘बहती गंगा है हाथ धो लो’ असे करू नये, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Byjantaadmin

Sep 2, 2023

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे. या घटनेवर सर्वज राजकीय पक्षाच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकीय पक्षांनी ‘बहती गंगा है हाथ धो लो’ असे करू नये. आरक्षणाची गरज नाही असे म्हणणारे ज्येष्ठ नेते वेगळेच बोलत आहेत. हा विषय राजकारणाचा नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार प्रयत्नशील आहे. असे असतानाही एखाद्या व्यक्तीला उपोषणाला बसवून त्याच्या तब्येतीची चौकशीही न करणे हा गंभीर प्रकार आहे. त्या गावात पोलिसांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राजकीय पक्षांनी ‘बहती गंगा है हाथ धो लो’ असे करू नये. आरक्षणाची गरज नाही असे म्हणणारे ज्येष्ठ नेते वेगळेच बोलत आहेत. हा विषय राजकारणाचा नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

तर पोलिसांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या दगडफेकीत जवळपास अधिकाऱ्यांसहित 12 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज मध्ये कोणीही गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारची काळजी घेण्यात आली असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. जर लाठीचार्ज झाला नसता तर पोलिसांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed