• Tue. Apr 29th, 2025

लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अन्यथा..; मराठा क्रांती मोर्चाचा स्पष्ट इशारा

Byjantaadmin

Sep 2, 2023

कऱ्हाड : मराठा समाजाच्या (Maratha Community) आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी काल अमानुष अत्याचार केले. महिला, लहान मुलांवर लाठीमार करीत त्यांना जखमी केले.त्याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने (Maratha Kranti Morcha) कऱ्हाड (जि. सातारा) येथील दत्त चौकात निषेध करण्यात आला. 15 सप्टेंबर पर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देत गृहमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळीमराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.जालना येथील पोलिस लाठीमाराची संतप्त प्रतिक्रिया येथे उमटली. जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याचामराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शनिवारी कऱ्हाडच्या दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन निषेध नोंदवण्यात आला. अमानुषपणे तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कऱ्हाडमध्ये रस्ता रोको

शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आदोलकांवर पोलिसांनी काल अमानुष अत्याचार केले. महिला, लहान मुलांवर लाठीमार करीत त्यांना जखमी केले. त्याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कऱ्हाड (जि. सातारा) येथील दत्त चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed