• Tue. Apr 29th, 2025

रितेश देशमुखच्या ‘वेड’ सिनेमाने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी

Byjantaadmin

Sep 2, 2023

विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या…

1. टीआरपीच्या शर्यतीत ‘वेड’ (Ved) हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. या सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला 7.8 रेटिंग मिळाले आहे.

2. ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. पण आता ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.

3.  टीआरपी लिस्टमध्ये ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.

4. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.

5. ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.

6. ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.

7. टीआरपीच्या शर्यतीत ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.

8. ‘कुन्या गावाची गं तू रानी’ ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.

9. नव्या स्थानावर ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका आहे. या मालिकेला 5.6 रेटिंग मिळाले आहे.

10. ‘अबोली’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.4 रेटिंग मिळाले आहे.

‘वेड’ सिनेमाने ‘ठरलं तर मग’ मालिकेला टाकलं मागे

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 20 ऑगस्टला होता. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला. सिनेगृहात पाहिलेला हा सिनेमा काही प्रेक्षकांनी तर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहिला. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत या सिनेमाला चांगले रेटिंग मिळाले. टीआरपीच्या शर्यतीत या सिनेमाला 7.8 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला या सिनेमाने मागे टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed