इंडियाच्या तिसऱ्या बैठकीसाठी देशभरातील मातब्बर नेते एकवटलेत. आमची आघाडी दिवसागणीक बळकट होत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष घाबरला आहे. आम्ही देशप्रेमी लोक असून, देशविरोधी लोकांविरोधात लढणार आहोत, असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे बोलताना व्यक्त केले. ते इंडियाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.दरम्यान उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आजच्या बैठकीत अनेक चांगले निर्णय घेण्चयात आले असून काही कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आम्ही सर्वांनी मिळून येणाऱ्या काळात हुकुमशाहीच्या, मित्रांसाठी काम करण्याऱ्याच्या विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ते वातावरण जावे, यासाठी इंडिया आघाडी काम करत आहे. पाच वर्षे लोकांची लुट आणि निवडणुकीच्या वेळेस सुट अशी यांची भुमिका असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की, एकीकडे गॅसची किंमत कमी केली आणि दुसरीकडे दाळीच्या किंमती वाढवत आहे. मग त्या गॅसवर जनतेने काय बनवायचे असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या निवडणुकीत हुकूमशाही आणि भाषणबाजीविरोधात लढण्याचा निर्धार आपण सर्वांनी केला आहे. आम्ही ऐकले होते – सबका साथ, सबका विकास. निवडणूक जिंकल्यानंतर मित्रमंडळी वाढली आणि त्यांचा विकास झाला. आमच्या एकजुटीमुळे विरोधकांमध्ये घबराट आहे. आम्ही क्रोनिझमच्या विरोधात लढू. घाबरू नका, आम्ही भयमुक्त भारत घडवणार आहोत. अखेर सरकारने अचानक संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
..तर वन नेशन वन इलेक्शन घ्याच
सुषमा अंधारे म्हणाल्या की, केंद्र सरकार देशात नवा कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कारण संसदेचे विशेष अधिवेशन मोदी सरकारकडून बोलवणयात आले आहे. यात एक देश, एक निवडणूक विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. याला विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला आहे. ठाकरे गटाकडून या विधेयकाला कडाडून विरोध केला जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला आव्हान दिले आहे. मोदी सरकारला हे सगळे आता सुचत आहे. कारण यांच्या आता लक्षात आलं आहे की, आता सगळी राज्य हातातून जातील. एक एक करुन हे निवडणुका हारतील. हे त्यांना चांगलेच माहिती आहे. म्हणून हे सगळे सुरू केले आहे. हिंमत असेल तर वन नेशन वन इलेक्शन घेऊनच टाका.