आज 1 सप्टेंबर रोजी मुंबईत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट आघाडीच्या (I.N.D.I.A.) तिसऱ्या बैठकीचा दुसरा दिवस आहे. हॉटेल ग्रँड हयात येथे सर्व नेते हजर झाले असून बैठकीला सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीकडून आज दुपारपर्यंत संयोजकाचे नाव जाहीर केले जाऊ शकते. तसेच, इंडिया आघाडीचा लोगो काय असावा?, यावरही विचारमंथन होणार आहे.
- बैठकसुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन करण्यात आले.








बैठकीसाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.
- इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे, अशी महत्त्वाची माहिती आज राज्याचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. वडेट्टीवार यांनी सांगितले की, लोगोबाबत आमचा विचार सुरू आहे. लोगोबाबत सर्व नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लवकरच त्यानुसार निर्णय होईल. आज होणारे लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे. आज संयोजक व जागावाटपासाठी समिती ठरवली जाईल. तसेच, इंडिया आघाडीची पुढील बैठक तामिळनाडूला होईल.
- काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आहेत. मुंबईतील ग्रॅन्ड ह्यात हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. मात्र, आज सकाळीच राहुल गांधी हॉटेलमधून बाहेर पडले. ते अचानक हॉटेलमधून गायब झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती
-
तिरंग्याच्या रंगात लोगो?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडिया आघाडीचा लोगो हा तिरंग्याच्या रंगात रंगवण्याचा विचार केला जात आहे. यात I.N.D.I.A चे IN भगव्या रंगाचे, D पांढर्या रंगाचे आणि IA हिरव्या रंगाचे असू शकते. इंडिया आघाडीच्या बैठकीत याला मंजुरी मिळाल्यानंतर आज लोगो प्रसिद्ध होणार आहे.
जागावाटपावर चर्चा
दरम्यान, देशात मुदतपूर्व निवडणूकीची शक्यता वर्तवली जात आहे. यापार्श्वभूमीवर जागावाटपाच्या सूत्रावर आघाडीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी प्रादेशिक पातळीवर समित्या स्थापन करण्याचीही चर्चा आहे. 31 ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशीच्या बैठकीला 28 पक्षांचे नेते उपस्थित होते. देश आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र आल्याचे यावेळी नेते म्हणाले होते. भाजपला सामोरे जाण्यासाठी विरोधकांकडून सामाईक कार्यक्रम तयार केला जाणार आहे.
आजचा असा असेल कार्यक्रम
- 10 वाजता नेत्यांचे फोटोसेशन. त्यानंतर 10.30 वाजता बैठकीला सुरूवात.
- सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बैठक. यात इंडिया आघाडीच्या लोगाबाबत विचारमंथन केले जाईल.
- दुपारी 3.30 वाजता इंडिया आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद होईल.