निलंगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी सौ.कोमलताई देशपांडे
निलंगा(प्रतिनिधी):-निलंगा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गट) महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी कोमलताई देशपांडे यांची प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व महिला प्रदेश सरचिटणीस महादेवी पाटील जिल्हा कार्याध्यक्ष अफसर शेख जिल्हाध्यक्ष मिनाक्षीताई शिंगडे यांच्या हस्ते निलंगा महिला तालुकाध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले त्यावेळी रुपाली ताई चाकणकर लातुर दौऱ्यावर होत्या.निलंगा तालुक्यातील पक्ष संघटन बांधणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे या निवडीबद्दल राज्याचे क्रिडामंत्री संजय बनसोडे , आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,महिला , माजी.जि.प.अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते पंडितराव धुमाळ,तालुकाध्यक्ष दिलीप पाटील शंकर बनसोडे, रियाज शेख,हरिदास साळुंके आदी सह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यापूर्वी कोमलताई देशपांडे जिल्हास्तरावर दहा वर्षांपासून कार्यरत आहेत.