माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून सत्कार
देवघर निवासस्थानी भेट विविध विषयवार केली चर्चा
लातूर -देशाचे भूतपूर्व केंद्रीय गृहमंत्री तथा पंजाबचे माजी राज्यपाल माननीय शिवराज पाटील चाकूरकर नुकतेच लातूर दौऱ्यावर आले असून त्यांच्या देवघर या निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी सदिच्छा भेट घेतली त्यांचा यावेळी सत्कार केला यावेळी विविध विषयांवर चाकूरकर साहेब यांच्या सोबत दिलीपराव देशमुख यांनी देश पातळीवरील, राज्य पातळीवरील विविध विषयवार चर्चा केलीयावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक अँड श्रीपतराव काकडे जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, अँड श्रीकांत उटगे,जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ, सचिन दाताळ उपस्थित होते