• Mon. Apr 28th, 2025

राज्यातील पहिल्या 12 डी मोशन थिएटरचे माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या हस्ते ई-उद्घाटन

Byjantaadmin

Aug 31, 2023
राज्यातील पहिल्या 12 डी मोशन थिएटरचे माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या हस्ते ई-उद्घाटन
लातूर (प्रतिनिधी): लातूर शहरातील प्रात्यक्षिक शिक्षणासाठी नावाजलेल्या स्टीम एज्युकेशन सेंटर येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या 12 डी मोशन थिएटरचे माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी बोलतेवेळी आ. अमित देशमुख यांनी या अनोख्या संकल्पनेला शुभेच्छा दिल्या आणि प्रात्यक्षिक शिक्षणाच्या या दर्जेदार लातूर पॅटर्न मधील हे 12 डी मोशन थिएटर आता विज्ञान पर्यटनासाठी सर्व विद्यार्थी व पालकांसाठी खुले झाले आहे अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टीम एज्युकेशन सेंटर चे अध्यक्ष प्रा.ओमप्रकाश झुरुळे यांनी केले.सध्या स्टिम एज्युकेशन सेंटर, लातूर याठिकाणी अद्यावत एस्ट्रोनॉमी, रोबोटिक्स ,एरोनॉटिकल , सायन्स , मैथमेटिक्स आणि लँग्वेज आदी लॅब् उभारण्यात आल्या आहेत तसेच याच ठिकाणी अद्यावत पाच टेलिस्कोप , एआर व्हिआर सिस्टीम, क्यूआर कोड द्वारे अनोखे शैक्षणिक प्रयोग, इंटरअँटिव्ह डिजिटल बोर्ड यासह खेळण्याच्या साहित्यातून प्रयोगात्मक शिक्षण दिले जाते.याठिकाणी फिरत्या तारांगण (Planetarium Dome) ची उभारणी करण्यात आली आहे.सध्या शालेय विद्यार्थी हे सहलीसाठी निसर्ग पर्यटनास अधिक प्रमाणात जातात पण आता स्टिम एज्युकेशन सेंटरच्या माध्यमातून विज्ञान पर्यटन (Science tourism) साठी विविध लॅब आणि महाराष्ट्र राज्यातील पाहिल्या 12 डी मोशन थिएटर ची विद्यार्थी अनुभूती घेतील.आतापर्यंत आपण 2 डी किंवा 3 डी सिनेमा पाहिला होता पण आता 12 डी मोशन थिएटरच्या माध्यमातून शैक्षणिक शो (ज्यात Space , Ocean , Environment, Science and technology चे व्हिडिओ) या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना अनुभवता येतील.याप्रसंगी श्रीशैल उटगे,चंद्रकांत झरीकुंठे, कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रवी नरहिरे, संतोष बिराजदार, बाबासाहेब गायकवाड, प्राचार्य एकनाथ पाटील,राम स्वामी, प्रवीण पाटील, सोनू डगवाले, इंजि.निळकंठ कोरे, बालाजी सावंत, संचालिका कल्पना झुरुळे, स्टीमच्या प्राचार्या पूनम पाठक आणि विविध महाविद्यालयातुन आलेले विद्यार्थी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed