विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिली. ते इंडियाच्या उद्याच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेला देशात परिवर्तन हवे असल्याचाही दावा केला.
जनतेला देशात परिवर्तन हवे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी जनतेला देशात परिवर्तन हवे असल्याचे स्पष्ट केले. जनतेला देशात परिवर्तन हवे आहे. अनेक राज्यांतून आम्हाला म्हणजे इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडियाच्या मुंबईतील बैठकीला 28 पक्ष व त्यांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. मायावतीचा भाजपशी ही सुसंवाद सुरू आहे, लोकांना देशात परिवर्तन हवे आहे, अनेक राज्यातून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे, असे पवारांनी म्हटले आहे.
सखोल चौकशी करावी
शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीतील पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून करण्यात येतात. त्यावर विचारले असता शरद पवारांनी म्हटले की, भोपाळमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीवर टीका केली. त्यात त्यांनी महाराष्ट्र बँक आणि इतर घोटाळ्याचा उल्लेख केला. त्यांच्याकडे सत्य असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी आणि सखोल चौकशी करावी. फक्त आरोप करू नये, असेही पवार यांनी म्हटले. बहुजन समाज पक्षाच्या मायावती या कोणासोबत जातील, हे पाहावे लागेल. त्यांनी भाजपसोबत जाण्याचं सूतोवाच केले असल्याचेही पवार यांनी म्हटले.
आम्ही काम करणे थांबवावे का?
शरद पवार म्हणाले की, ‘दैनिक सामना’तील अग्रलेखातून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली जाते याबाबत शरद पवार यांना विचारले. त्यावर माध्यमांनी आमच्यावर टीका केली तर आम्ही काम करणे थांबवावे का, असा उलट प्रश्न केला. तर, पवार यांनी उत्तर देण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो, अशी मिश्किल टिप्पणी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसलाय जसे इंडिया पुढे जाईल तसे चीन मागे हटेल. आम्ही आलेल्या सर्व नेत्यांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करणार आहोत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.