मोदी-शाहांना रोखण्यासाठी मुंबईत एकवटलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’तील नेत्यांनी बैठकीआधीच सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकले. त्यात मुंबईच्या बैठकीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख UDHAV THAKRE तर मोदी सरकारला ‘गॅस’वर बसवून वातावरण तापले. ‘हे सरकार गॅसवर असल्याचा तिरकस टोला लागवून, हे सरकार लवकर जाणार आहे, असेच ठाकरेंची सूचित केले. ‘गॅसवर असल्यानेच गॅस सिलिंडरच्या किमती काहीशा कमी केल्याचा सांगून ठाकरेंनी मोदी सरकारला पाडणार असल्याचेच जाहीर करून टाकले. परिणामी, ‘इंडिया’ची बैठक गाजणार असल्याचे बुधवारी अधोरेखित झाले.विरोधी पक्षांच्याINDIA आघाडीची बैठक मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमिवर आघाडीच्या घटक पक्षांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार बल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील सगळ्या महिलांना सुरक्षीत वाटले, असे सरकार आम्ही देशात स्थापन करणार करू. केंद्र सरकारने मंगळवारी एलबीच्या गॅसच्या सिलिंडरच्या किमतीमध्ये २०० रुपयांची कपात केली. यावरून ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
केंद्र सरकारला आणि BJP मागील नऊ वर्षात रक्षाबंधन झाले नाही का ? तेव्हा भावाला बहिनींची आठवण आली नाही का, असा सवाल त्यांनी केला. आम्ही तानाशाही आणि जुमलेबाजीच्या विरोधात आहोत. आता केंद्रातील सरकारवर गॅसवर असल्याचेही ते म्हणाले. आमच्या बैठकीमुळे विरोधकांनी ‘एनडीए’ची बैठक बोलावली असले. विकास महत्त्वाचा आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे स्वातंत्र आहे. इंग्रजही विकास करत होते. आता भारत मातेच्या हातापायात बेड्या घालू देणार नाही. आम्ही कुणालाही हुकुमशाहा होऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.यावेळी ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आता, की ‘इंडिया’ आघाडीचे संयोजक कोण असणार आहे. त्यावर सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आता देता येणार नाही. आमची दोन दिवस बैठक आहे. त्यानंतर आम्ही सगळ्या प्रश्नाची उत्तरे देऊ. कर्नाटकमध्ये भाजपला बजरंगबली पावला नाही. तुम्ही आघाडीत एकत्र आहात मात्र, तुमच्या पक्षाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जाते. त्यावर ठाकरे म्हणाले आम्ही ज्यांच्या सोबत असतो, त्यांच्यावरच टीका करतो, असे मजेशीर उत्तर दिले. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक पर्याय आहेत. मात्र, भाजपकडे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सोडून कोणता पर्याय आहे, असा सवाल त्यांनी केला.