रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थिनी समुपदेशन
लातूर/प्रतिनिधी:स्त्री सबलीकरण आणि स्त्री सुरक्षा ही काळाची गरज आहे.स्त्रियांमध्ये निरोगी वृत्तीसह निरोगी मन या उक्तीप्रमाणे मुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक,भावनिक स्थित्यंतराबाबत जागरूकता व्हावी यासाठी मिशन पिंक हेल्थ अंतर्गत रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थिनी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मिशन पिंक हेल्थ लातूरच्या सचिव डॉ.रचना जाजू,सदस्या डॉ.अर्चना कोंबडे , डॉ.सारिका देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ.सारिका देशमुख यांनी मिशन पिंक हेल्थ उपक्रमाचा परिचय आणि स्त्री प्रजनन संस्थेविषयी माहिती सांगितली.डॉ. रचना जाजु यांनी मासिक पाळीची स्वच्छ्ता आणि त्यादरम्यान घ्यावयाची योग्य काळजी याविषयी मार्गदर्शन केले.डॉ.अर्चना कोंबडे यांनी स्त्रियांसाठी आवश्यक पोषक आहाराचे महत्त्व विषद केले.या चर्चासत्रात विद्यार्थिनी आणि शिक्षिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली.
यावेळी उपप्राचार्या सौ.अनुराधा कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.सौ. सोनाली दर्डा यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला.उपप्राचार्या सौ.अनुराधा कुलकर्णी यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूल ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर चालत असल्याविषयी माहिती दिली .
रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे शालेय समिती अध्यक्ष डॉ.मनोज शिरूरे तसेच शालेय समिती सदस्या सौ. सुप्रियाताई सावंत यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. सोनाली दर्डा आणि आभार प्रदर्शन सौ.वृषाली जाधव यांनी केले.