• Tue. Apr 29th, 2025

लातूर जिल्ह्यातील मध्यम, लघु पाटबंधाऱ्यातील पाणी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

Byjantaadmin

Aug 30, 2023

लातूर जिल्ह्यातील मध्यम, लघु पाटबंधाऱ्यातील पाणी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

लातूर दि. 30 ( जिमाका ) लातूर जिल्ह्यात ऑगस्ट 2023 अखेर समाधानकारक पाऊस झाला नाही तसेच मान्सून मध्ये पावसाची प्रगतीही नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्व मध्यम, लघु पाटबंधारे यातील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काढला आहे.जिल्हयातील मध्यम व लघु प्रकल्पातील उपयुक्त आसलेल्या पाण्याच्या पातळी चा आढावा घेऊन संभाव्य पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी दि.७.०९.२०१५ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराद्वारे लातूर जिल्हयातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठे टंचाई कालावधी मध्ये केवळ पिण्याच्या पाण्यासाठी या आदेशाव्दारे आरक्षित करण्यात आले आहे.या आदेशानुसार यंत्रणेच्या कार्यक्षेत्रातील सर्व पाणी साठे आरक्षित करण्यात आले आहेत, त्या प्रकल्पातील पाणीसाठा अनधिकृतपणे उपसा होणार नाही याची दक्षता पाटबंधारे विभागाने घ्यावी. त्या त्या पाटबंधारे क्षेत्रातील कार्यकारी अभियंता यांनी धरणातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता पथक नेमावे असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

एम.आय.डी.सी च्या पाण्यातही होणार कपात

लातूर जिल्ह्यातील आणि शहरातील औद्योगिक क्षेत्रातही येणाऱ्या काळातील पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी कपात करण्याची सूचना संबंधित विभागाला दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed