• Tue. Apr 29th, 2025

लातूरच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने कोटामध्ये आत्महत्या का केली?

Byjantaadmin

Aug 30, 2023

लातूर : डॉक्टर व्हायचे स्वप्न अर्ध्यावर टाकून लातूरच्या विद्यार्थ्याने राजस्थानातील कोटा येथे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या लातूर येथील १७ वर्षीय विद्यार्थ्याने कोचिंग क्लासेसच्या इमारतीवरून उडी मारून आयुष्याची अखेर केली. आविष्कार कासले असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.कोचिंग हब अशी ओळख असलेल्या कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. रविवारच्या दिवसात अवघ्या चार तासांच्या कालावधीत दोघा विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं. तर आठ महिन्यांच्या काळात २४ विद्यार्थ्यांनी कोटा येथे जीवनयात्रा संपवल्याचं समोर आलं आहे.लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील उजना या गावचा रहिवासी असलेल्या अविष्कारचे वडील शिक्षक असून आई नांदेड जिल्ह्यातील किनावट तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी आहे. आविष्कारचा मोठा भाऊ हैद्राबाद येथे आयआयटीमध्ये आहे. त्याचे शिक्षणही कोटामधून पूर्ण झाले.

Latur Kota Student Avishkar Kasale Suicide New

 

आविष्कारही शालेय जीवनात हुशार विद्यार्थी. घरात शैक्षणिक वातावरण असल्यामुळे आपणही शिकून डॉक्टर व्हावे अशी अविष्कारची इच्छा होती. त्यात भाऊही कोटा येथे शिक्षण घेत आयायटीला लागला. त्यामुळे देशभरातून नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोटा येथेच नीटच्या तयारीसाठी जाण्याचा निर्णय त्याने घेतला.वर्षभरापासून तो कोटा येथे नीटची तयारी करत होता. त्याच्यासोबत आजी आजोबा होतेच. नीट परीक्षेची तयारी करून आपण डॉक्टर होऊ असे त्याचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न अर्ध्यावर टाकून त्याने रविवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास जवाहर नगर कोचिंग क्लासच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली.

रूग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्याआधी आविष्कारचा मृत्यू

आविष्कारने उडी मारल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचण्याआधीच आविष्कार हे जग सोडून गेला होता. अत्यंत शांत स्वभावाच्या आविष्कारने आत्महत्या केल्याची माहिती मिळातच त्याच्या नातेवाईक तसेच शिक्षकांना धक्का बसला आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांसह मित्र परिवार, शिक्षक यांच्यावरच नव्हे तर लातूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed