लातूर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा-संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लातुर/प्रतिनिधी संपूर्ण लातूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरा पासुन पाऊस नाही त्यामुळे पिके करपून गेले आहेत. खरीप हंगाम हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून ताबडतोब पंचनामे न करता सरसकट एकरी पंन्नास हजार रुपये नुसकान भरपाई शेतकरी बॅंक खात्यात जमा करावी आणि पिकवीमा शंभर टक्के अग्रिम मंजूर करण्याचे आदेश काढावेत अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर रस्त्यावर येऊन आक्रमक पध्दतीने आंदोलन करुन विरोध प्रकट करेल याची गंभीरपणे नोंद घ्यावी असी मागणी निवेदनाद्वारे लातूर जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या कडे करण्यात आली निवेदनावर संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक उमाकांत उफाडे. जिल्हाध्यक्ष रामहरी भिसे .जिल्हा सचिव रफिक शेख. महानगर अध्यक्ष मिथुन दिवे. शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन जाधव पाटील.तालुकाध्यक्ष अॅड मनोजकुमार नरवडे. उपाध्यक्ष ईर्शाद शेख.विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अषिश अजगरे यांच्या सहित शेकडो शेतकरी. पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी आहेत .