जि.प.प्रा.शाळा सावनगीरा शाळेस कै. माधवराव गोपाळ सोळंके यांच्या स्मरणार्थ संगणक संच भेट
निलंगा :-आज दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावनगीरा येथे *कै.माधवराव गोपाळ सोळंके* यांच्या स्मरणार्थ श्री.सिद्राम माधवराव सोळंके यांची सुकन्या *हेमाताई सिद्राम सोळंके P.S.I* पिंपरी चिंचवड येथे कार्यरत व *श्रीहरी सिद्राम सोळंके कौशल्य विकास अधिकारी*, धाराशिव या दोन भावंडांनी सामजिक उत्तरदायित्व राखत आपल्या गावातील मुलांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान व तंत्रज्ञान यांची ओळख व्हावी म्हणून शाळेस *संगणक संच* भेट दिला म्हणून शाळेतर्फे श्री. सिद्राम माधवराव सोळंके व सौ. विजयाबाई सिद्राम सोळंके यांचा *आदर्श पालक* म्हणून सत्कार करण्यात आला.यावेळी गावचे सरपंच श्री.दयानंद काळे,वि का सो वाही चेअरमन अशोकराव सोळंके.श्री.दगडू सोळंके माजी चेअरमन, श्री. कमलाकर जाधव माजी उप सरपंच, श्री.व्यंकट पाटील माजी सरपंच,श्री.,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. पंढरी जाधव, उपाध्यक्ष श्री.अर्जुन शिंदे, कार्यतत्पर पालक श्री. अप्पाराव सोळंके, बबन सोळंके,अनिल जाधव,सतीश शिंदे, किशोर पाटील , रमाकांत सोळंके व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते.तसेच श्री. प्रकाश गायकवाड सर व श्री. सचिन सावळकर सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश जाधव सर यांनी आभार मानले.