• Wed. Apr 30th, 2025

मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनासाठी लातूर जिल्हयातील पञकार यांनी उपस्थितीत राहावे

Byjantaadmin

Nov 14, 2022

मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनासाठी लातूर जिल्हयातील पञकार यांनी उपस्थितीत राहावे-लातूर जिल्हाप्रसिध्दीप्रमुख प्रशांत साळुंके यांचे आवाहन

लातूर-(प्रतिनीधी)मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आकर्षण केंद्र म्हणून तीन कार्यक्रमाचा उल्लेख होत असून.या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तसेच आम्ही अॅंकर हे चर्चासञ व परिसंवाद त्याच बरोबर डिजिटल मीडिया प्रिंट मीडियाला धोका ठरतोय का हा परिसंवाद व खा.अमोल कोल्हे यांची प्रगट मुलाखत या तीन कार्यक्रम हे येणाऱ्या पत्रकार बांधवां साठी महत्त्वाचे व आकर्षक ठरणारा असून या अधिवेशनातील कार्यक्रमाचा लाभ सर्व उपस्थित पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे लातूर जिल्हाप्रसिध्दीप्रमुख प्रशांत साळुंके यांनी केले.
मराठी पञकार परीषदेच्या 43 व्या पिंपरी चिंचवड येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय आधिवेशनत विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सध्या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू असून चर्चा सञ व परिसंवाद हे महत्वाचे ठरणार असून तसेच “आम्ही अँकर” हे चर्चासत्र आकर्षक ठरणार असून यामध्ये रोज आपल्या समोर टीव्ही चॅनलवर दिसणारी अँकर मंडळी ही रोज त्यांच्या समोर असणाऱ्या समस्या व त्यांचे प्रश्नही मांडणार आहेत त्यांचे अनूभव कथन करणार आहे. या चर्चासत्रात न्यूज 18 लोकमतचे मिलिंद भागवत, विलास बडे, एबीपी माझाचे अश्विन बापट, झी 24 तास च्या अनुपमा खानविलकर, रेश्मा साळुंखे, टि व्ही 9 च्या निकिता पाटील यांचा सहभाग असणार आहे या बरोबरच दि डिजिटल मीडिया प्रिंट मीडियाला धोका ठरतोय का या महत्त्वपूर्ण विषयावर व सध्या पत्रकार चर्चेच्या असणाऱ्या विषयावर परिसंवाद होणारा असून या चर्चासत्रास अध्यक्षस्थानी जेष्ठ माध्यमकर्मी समिरण वाळवेकर, हे तर या चर्चासञात सकाळचे समूह संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक पराग करंदीकर, मॕक्स महाराष्ट्राचे संपादक रवी अंबेकर, जेष्ठ संपादक तुळशीदास भोईटे यासह परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख परिषदेचे विश्वस्त किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे आदींची उपस्थिती या चर्चासत्रात लागणार आहे हे दोन्हीही चर्चासत्र या अधिवेशनाचे केंद्रबिंदू ठरणारा असून आकर्षणही येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचे ठरणार आहे त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील शिवछत्रपती म्हणून ओळखले जाणारे चित्रपट अभिनेते खा. अमोल कोल्हे यांची प्रगट मुलाखत हे ही आकर्षण ठरणारा असून त्यांची मुलाखत मिलिंद भागवत व विलास बडे ही ज्येष्ठ अँकर मंडळी घेणार आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्या साठी पिंपरी चिंचवड पञकार संघाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. यामुळे या अधिवेशनात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचा लाभ येणाऱ्या पत्रकारांनी उपस्थिती लावावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे लातूर जिल्हाप्रसिध्दीप्रमुख प्रशांत साळुंके यांनी केले आहे.

लातूर जिल्हाप्रसिध्दीप्रमुख,लातुर
मराठी पञकार परीषद, मुबंई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *