• Tue. Apr 29th, 2025

पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये निलंगा मॅरेथॉन ग्रुप ने पटकवले 6 मेडल्स

Byjantaadmin

Aug 29, 2023
पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये निलंगा मॅरेथॉन ग्रुप ने पटकवले 6 मेडल्स
27 ऑगस्ट रोजी किल्ले पन्हाळ गडावर अतिशय आव्हानात्मक हिल हाफ मॅरेथॉन झाली.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने  तसेच बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशीद यांच्या बलिदानाने पावन झालेल्या पन्हाळगडावर होती.
ही स्पर्धा पन्हाळ गडावरून सुरू होते व गडाच्या पायथ्या पासून यू टर्न घेऊन परत गडावर व गडावरील असलेल्या जंगलातुन असे एकूण 21km चे अंतर कट ऑफ टाईम मध्ये पूर्ण करावे लागते. या स्पर्धेत निलंगा मॅरेथॉन ग्रुप चे गणेश एखंडे, डॉ सचिन बसुदे, डॉ नितीश लंबे व निलंगा पंचायत समितीचे पूर्वीचे व सध्या तुळजापूर चे बी.डी.ओ. अमोल ताकभाते यांनी 21km च्या कॅटेगरी मध्ये विक्रमी वेळात स्पर्धा पूर्ण करून मेडल्स पटकावले तर, 10km च्या कॅटेगरी मध्ये हरिविजय सातपुते व महाराष्ट्र विद्यालय निलंगा चे शिक्षक भरत सोनवणे यांनी विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करून मेडल्स पटकावले.निलंगा मॅरेथॉन ग्रुप च्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed