ठाणे महापालिकेचे पहिले सभापती गोवर्धन चांगो भगत यांच्या जीवनावर आधारीत “अष्टपैलू दादा ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
ठाणे (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)गडकरी रंगायतन ठाणे येथे दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत ठाणे महापालिकेचे पहिले सभापती गोवर्धन चांगो भगत यांच्या जीवनावर आधारीत “अष्टपैलू दादा ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या पुस्तकाचे शब्दांकन प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक लेखक असलेले राम माळी यांनी केले असुन प्रकाशन पुस्तक मार्केटचे संपादक लेखक मिलिंद कसबे यांनी केले आहे. या पुस्तकाचे मुख्य वितरण दिवा शिक्षण संस्था व कनिष्ठ महाविद्यालय तसेच पुस्तक मार्केट यांच्या मार्फत होणार आहे. अष्टपैलू दादा या पुस्तकाचा परिचय लेखक निवेदक श्रीकांत चौगुले हे करून देणार असून, या कार्यक्रमास माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे मा.आमदार सुभाष भोईर, माजी नगराध्याक्ष सौ पौर्णिमा कबरे, जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले,दै.ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, लोकक्रांती चे संपादक डी बी पाटील, नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक शैलेश पाटील, रेश्मा नरेश पवार, दिग्दर्शक,पत्रकार महेश्वर तेटांबे, लक्ष्मण पाटील, भोला पाटील, शबनम शेख, इ राजकीय, साहित्यिक, कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व फणी आणि गाणी हा बहारदार कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गोवर्धन भगत, मुख्याध्यापक संजय महाजन व लेखक दिग्दर्शक राम माळी यांनी एका पत्रकात दिली आहे.