कासार सिरसी येथे रविवारी लिंगायत समाजाच्या 70 गाव कार्यकर्त्यांचा मेळावा
कासार सिरसी ः लिंगायत महासंघाच्यावतीने निलंगा तालुक्यातील औसा विधानसभा मतदारसंघातील व आजुबाजूच्या 70 गावातील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा रविवार दि.3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता करीबसवेश्वर मठ कासार सिरसी ता.निलंगा येथे आयोजित करण्यात आला असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
या मेळाव्यात लिंगायत समाजाची आजची स्थिती, लिंगायत समाजाची भविष्यातील वाटचाल तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय स्थितीवर चिंतन-मंथन करण्यासाठी लिंगायत कार्यकर्त्यांचा सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच आशिर्वचनासाठी कासार सिरसी व तांबाळा मठाचे शिवाचार्य म.नि.प्र.मृगेंद्र उर्फ विजयकुमार शिवाचार्य महाराज तसेच अनेक राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक नेते, लिंगायत महासंघाचे जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात चांद्रयान -3 या चंद्रावर यान पाठविणार्या मोहिमेत सहभागी झालेल्या शास्त्रज्ञ श्री स्वामी यांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. तसेच अनुभवमंटप निलंगा येथील महिला मंडळाच्यावतीने सामुहिक इष्टलिंगपुजा केली जाणार आहे.
तरी परिसरातील सर्व समाजबांधवांनी व युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लिंगायत महासंघाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष करीबसवेश्वर पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे, सचिव अशोकअप्पा काडादी, जिल्हा सहसचिव तानाजी डोके, शिवाजी भातमोडे, अमर मुगावे, शहराध्यक्ष डॉ.मन्मथ गताटे, सहसचिव रामेश्वर तेली, दिलीप रंडाळे, एन.आर.स्वामी, एम.एम.बिरादार, इंजि.भुसनूरे, ब्रम्हवाले गुरूजी, नागनाथ स्वामी, विलास व्होनाळे, नागनाथप्पा निला, माणिक कोकणे, अप्पासाहेब बिराजदार यांच्यासह लिंगायत महासंघाच्या महिला अध्यक्षा सौ.संगिता भुसनूरे, महिला सचिव सौ.वैशाली व्होनाळे यांच्यासह 70 गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व लिंगायत महासंघाचे सर्व सदस्य यांनी केले आहे.
कासार सिरसी येथे रविवारी लिंगायत समाजाच्या 70 गाव कार्यकर्त्यांचा मेळावा
