महाराष्ट्र महाविद्यालयात सामाजिकशास्त्रे मंडळाचे उद्घाटन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे मंडळाचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटन समारंभासाठी लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. सदाशिव दंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात उपलब्ध असणाऱ्या पारंपारिक व कौशल्याधारित विविध संधींबद्दल माहिती सांगीतली. इतिहास विषयासोबतच पर्यटनशास्त्र, संग्रहालय शास्त्र, पुरातत्वशास्त्र अशा विविध इतिहासाशी संबंधीत विषयांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचेही प्रतीपादन केले. त्याचबरोबर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन या विषयांमध्येही कौशल्याधारित करिअरच्या संधी असल्याचे प्रतीपादन त्यांनी केले. कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी संयमाने व कौशल्याधारित शिक्षण घेतल्यास भविष्यात त्यांना अनेक पर्यायही उपलब्ध असल्याचे मत त्यांनी प्रतीपादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके हे होते. त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सामाजिक शास्त्रे ही खऱ्या अर्थाने व्यक्तीला समाजाभिमुख बनवण्याचे काम करते. विद्यार्थ्यांनी तीन वर्षात मिळवलेले सामाजिक शास्त्रांचे ज्ञान व्यक्तीगत जीवनासोबतच सामाजिक उन्नतीसाठीही उपयोगात आणावे असे आवाहन याप्रसंगी केले.
सामाजिक शास्त्रे मंडळाचे पदाधिकारी म्हणून प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून दिपाली झरे, उपाध्यक्ष म्हणून जाधव राजश्री, लंगुटे सरस्वती, सचीव म्हणून येवते शंभू, सहसचीव आरती चौधरी तर सदस्य म्हणून मुडे लक्ष्मी, गुमटे आरती, गिरी काशीबाई, ढोणे भाग्यश्री, पांचाळ वैभव, सोमवंशी मोनिका, मुल्ला बुशरा या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. शेषराव देवनाळकर यांनी सामाजिक शास्त्रे मंडळाच्या वतीने अभ्यासक्रमपुरक राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती सांगीतली. याप्रसंगी मंडळ प्रतिनिधी म्हणून मोहीनी सोळुंके हीने विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन विद्यार्थीनी रुपाली चौधरी, आरती गुमटे, कमल गोमसाळे यांनी केले तर आभार डॉ. विठ्ठल सांडूर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ सुभाष बेंजलवार, प्रा. शिवरुद्र बदनाळे, प्रा. दत्ता पवार, प्रा. रवी सुरवसे, प्रा. अनुराधा महाजन, प्रा.पुनम सातपूते, प्रा. अंकूर पाटील, श्री गणेश वाकळे, श्री सिद्धेश्वर कुंभार, श्री मुळे विष्णू, दापके सावता इत्यादिंनी परीश्रम घेतले.