लातूर शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील प्रभाग क्र.२ मधील नागरिकांशी सुसंवाद
स्थानिक स्वराज्य संस्थेत सध्या लोकप्रतिनिधी नाहीत लातूर महानगरपालिकेतदेखील प्रशासक आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली आहेत. या अनुषंगाने लातूर शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्यावतीने ऍड.फारुख शेख यांच्याकडून नुकतीच लातूर शहरातील प्रभाग
क्रमांक २ मधील इकबाल चौक रोहित वडुरले यांच्या निवासस्थानी सुसंवाद बैठक संपन्न झाली.
यावेळी प्रभागातील पाणीपुरवठा,साफसफाई, घंटागाडी,पथदीवे, निराधारांच्य,पगारी, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती तसेच, नवीन शिधापत्रिका नोंदणी या बाबतची माहीती करून घेतली. तसेच येथील महिला गृहिणींनी वाढती महागाई,महिलांवरील वाढते अत्याचार, निराधारांचे प्रश्न,बेरोजगारी यासारखे प्रश्न सध्याचे देशातील व राज्यातील भाजप सरकार सोडवत नाही, त्यामुळे काँग्रेस शिवाय आता पर्याय नाही अशा भावना सर्वसामान्य लातूरकर व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे. या वेळी प्रभागातील सय्यद युसुफ, शेख मुनव्वर, शेख निजाम,डॉ.अभिमनयु मुलदुडवार,नजीर हुसेन सय्यद,निसार पठाण,भाऊसाहेब भडीकर,मैनोद्दीन शेख,जिशान पठाण,आरीफ पठाण,शेख हायात, असीफ फुलारी,आली सय्यद,शाम
अंकुशे,राहुल सुर्यवंशी,नागनाथ पेंढारकर मामा,शिवराज वडुरले, उषाताई वडुरले,निसार चौधरी,अंनिस पठाण,ओमकार जोगे,राहुल वाघमारे,राजु सुर्यवंशी,ऍड.बशीर शेख, पाशा मुल्ला,अब्दुल पठाण आदी नागरिक उपस्थित होते. या वेळी पेंढारकर मामा,ऍड.बशीर , प्रभाग अध्यक्ष शेख निजाम,शेख मुनव्वर,भाऊसाहेब भडीकर यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच उपस्थित नागरिकांनी हि आपल्या समस्या मांडल्या. या सुसंवाद बैठकीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशा शब्दात लातूर
शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे ऍड.फारूक शेख यांनी आपले विचार मांडले व उपस्थित नागरिकांना आश्वस्त केले. या बैठकीला स्थानिक जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.