शेतकऱ्यांच्या पिक विमा मिळण्यासाठी शिवसेना जिल्ह्यातील आमदार निलंगेकर व आमदार पवार यांच्या घरावर मोर्चा काढणार…जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने*
निलंगा/प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात गेल्या 33 दिवसापासून पावसाचा खंड असल्याकारणाने आमदार निलंगेकर व औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या घरावर मोर्चे काढून त्यांना घेराव घालणार असे लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये इशारा दिला आह याबाबत अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यात दुष्काळाचे नैसर्गिक सावट निर्माण होऊन सोयाबीन तूर मूग उडीद यासारखे असणारे नगदी पिके पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे होरपळून जात आहेत तरीही शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या स्टंटबाज सरकारकडून कसल्याही प्रकारची मदत शेतकऱ्याला केली जात नाही यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या अगोदरही जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली आहे यानंतर शासनाला खडबडून जागे करण्यासाठी आज निलंगा येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करून पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी लातूर जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार व जिल्ह्यातीलच मंत्री असणारे संजय बनसोडे यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अन्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने लातूर शिवसेना रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही 14 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर 15 सप्टेंबर रोजी आमदार संभाजीराव निलंगेकर यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल व 16 सप्टेंबर 2023 रोजी औसा आमदार अभिमन्यू पवार यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांना घेराव घालण्यात येईल याउपरही शेतकऱ्यांना मदत नाही मिळाल्यास लातूर जिल्ह्यातीलच मंत्री असणारे संजय बनसोडे यांना सुद्धा घेराव घातला जाईल यासाठी शासनाने तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार 21 दिवस सतत पावसाचा खंड असल्यास पंचवीस टक्के आगाऊ पिक विमा रक्कम देण्याच्या नियमानुसार 33 दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे तात्काळ 25% आगाऊ पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा शिवसेना आंदोलन करणारच असा इशाराच जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी दिला आहे यावेळी शिव सहकार सेनेचे जिल्हा संघटक विनोद आर्य शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे शिरूर अनंतपाळ चे तालुकाप्रमुख भागवत वंगे देवणी तालुकाप्रमुख मुकेश सुडे निलंगा शहर प्रमुख सुनील नाईकवाडे लातूर शिवसेनेचे शहर संघटक रघु बनसोडे निलंगा विधानसभा प्रमुख शिवाजीराव पांढरे माजी तालुका संघटक जगदीश लोभे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रमोद कदम उपतालुकाप्रमुख अर्जुन नेलवाडे मुस्तफा शेख सोमनाथ स्वामी उमेश नेलवाडे सचिन अरिकर गोविंद माने उपशहर प्रमुख संतोष मोघे आधी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते