• Tue. Apr 29th, 2025

रक्षाबंधन सोबत वृक्षबंधन

Byjantaadmin

Aug 29, 2023

रक्षाबंधन सोबत वृक्षबंधन
रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच प्रेमाचं नात अधिक दृढ करण्याचा सण. वृक्षबंधन द्वारे मनुष्याचे वृक्षांसोबत चे नाते अधिक दृढ करण्यासाठी, मनुष्याद्वारे वृक्षांचे रक्षण व्हावे, वृक्ष जोपासना व्हावी. याकरिता आज किड्स इन्फोपार्क या शाळेत एका भव्य व देखण्या कार्यक्रमात झाडांची पूजा करून झाडांना राखी बांधन्यात आली.
नंतर शाळेतील मुलींनी कापूर तुळस बियांपासून बनविलेल्या पर्यावरन पूरक राख्या मुलांना बांधल्या, मुलांनी ओवाळणी म्हणून एक मोगरा रोप बहिणीला भेट दिले.
यानिमत्ताने भावा बहिणींच्या प्रेमाचा हा सण निसर्ग प्रेमाचा एक नवीन संदेश देऊन गेला. आजच्या या काळात झाडांचे संरक्षण करण्याचा संकल्प सर्वांनी करणे गरजेचे आहे.यावेळी प्राचार्य प्रीती शहा यांनी विद्यार्थ्यांना बियांचे रोपण करणे व मोगरा रोप घरी कुंडीत लावण्याबद्दल सूचना देऊन वृक्ष संगोपन, वृक्ष जोपासना करण्याची शपथ दिली.आजच्यावृक्ष बंधनउपक्रमामुळे ३०० घरांमध्ये तुळस बिया पोहंचल्या, प्रत्येक घरी दोन तीन तुळस रोपे नक्कीच वाढतील,सोबत ३०० मुलींच्या घरी मोगरा रोप स्थिरावेल.या अत्यंतआगळावेगळाउपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.एका छोट्याशा कृतीने घरोघरी वृक्षांची संख्या नक्कीच वाढेल व ग्रीन लातूर वृक्ष टीमचा हरित घर हा उपक्रम साध्य होईल.भारतातील प्रत्येक सण, उत्सव,परंपरा या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रकृती आणि पर्यावरणासोबत जुड लेल्या आहेत. प्रत्येक सण, उत्सव आपण प्रकृतीच्या प्रतीक स्वरूपात साजरा करत असतो. रक्षाबंधन सुद्धा हा त्यातील एक उत्सव आहे. या निमित्ताने आपण संकल्प घेऊया की, प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरण पूरक पद्धतीने आपण साजरे करू जेणेकरून आपला पर्यावरण टिकून राहील, परंपरा टिकून राहील प्रकृती सुद्धा टिकून राहील आणि आपली येणारी पिढी सुद्धा यापासून संरक्षित होईल.या उपक्रमकरीता किड्स इन्फोपार्क च्या प्राचाऱ्य्या प्रीती शहा मॅडम, धनंजय नाकाडे, अजित बजाज, नैना पाटील,ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लढ्ढा, अड वैशाली यादव, दयाराम सुडे, पद्माकर बागल, सुलेखा कारेपूरकर, अरविंद फड, बळीराम दगडे, शुभम आवाड, गीता आकुडे, ज्योती सुर्यवंशी यानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed