युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांचा वाढदिवस साजरा
निलंगा: शिवसेना युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांचा वाढदिवस युवासेनेच्यावतीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयात निलंगा येथे रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, शुभम डांगे, श्रीनिवास भोसले सतीश धायगुडे, रवी नागरसोगे, पार्थ शेळके, बलवान कांबळे, बजरंग कांबळे, गोलू लांडगे, सोनू वाघमोडे इत्यादी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.