मंगेशकर महाविद्यालयात रासेयो दिनानिमित्त वृक्षारोपण
औराद शहाजानी:येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागच्यावतीने एन.एस.एस. वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी दिवसेंदिवस होणारी वाढती वृक्षतोड व पर्यावरणाचे असंतुलन यामुळेच वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे हे जाणून सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करावे. झाडे लावून आपली जबाबदारी संपत नाही तर झाडे कायमची जगली पाहिजेत; याकडे सर्व विद्यार्थ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे असे प्र.प्राचार्य डाॅ.प्रदीप पाटील यांनी प्रतिपादन केले. डाॅ.आनंद मुसळे, डाॅ.मोहन बंडे यांनी एन.एस.एस. दिनानिमित्त उद्बोधन केले. कार्यक्रमाधिकारी डाॅ.अशोक नारनवरे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी कार्यक्रमाधिकारी डाॅ.शीतल गुंजटे, डाॅ.भगवान कदम, डाॅ.विनोद चिंते, डाॅ.विनोद जाधव व विद्यार्थी उपस्थित होते.